महेंद्रगड: हरयाणाच्या महेंद्रगड येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १५ विद्यार्थी हे जखमी आहेत. सकाळच्या सुमारास स्कूल बस उलटून ही मोठी दुर्घटना घडली. महेंद्रगडच्या उन्हानी गावात हा भीषण अपघात झाला. मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल बल उलटून हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बसला सरळ केलं. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. जेव्हा ही बस उलटली तेव्हा बसमध्ये ४० विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इदची शासकीय सुट्टी असूनही महेंद्रगडची जीएल पब्लिक स्कूल आज सुरु होती. हे मुलं स्कूलबसमध्ये बसून शाळेत जात होते. ही बस उन्हानी गावात पोहोचताच उलटली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच विद्यार्थ्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झालेला होता, तर एकाच प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र काहीच वेळात त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांचा उपचार सुरु आहे. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये बसचा अक्षरश: चुराडा झालेला दिसत आहे. तसेच, जखमी अवस्थेतील विद्यार्थी रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. तर, उपस्थित नागरिक त्यांना उचलून रुग्णालयात नेताना दिसून येत आहे.