या ठिकाणी चुकूनही ठेवू नका वाय-फाय राउटर
तळमजल्यावर
जर तुमच्या घरात अनेक मजले असतील तर मधल्या फ्लोरवरच तुम्ही वाय-फाय राउटर ठेवला पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला वर आणि खाली अश्या दोन्ही बाजूंच्या फ्लोर्सवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते. तर फक्त तळमजल्यावर वाय-फाय राउटर ठेवल्यावर एका किंवा दुसऱ्या मजल्यापर्यंतच वाय-फायची मर्यादित राहते.
कोणत्याही स्टूल किंवा टेबलवर चुकूनही ठेऊ नका
अनेक घरांमध्ये वाय-फाय राउटर स्टूल किंवा टेबलवर ठेवला जातो त्यामुळे इंटरनेटची रेंज प्रभावित होते. वाय-फाय राउटर नेहमीच थोडा उंचीवर असला पाहिजे त्यामुळे कानाकोपऱ्यात एक सारखी रेंज मिळते आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली राहते.
बंद खोलीत
जर तुम्ही तुमचा वाय-फाय राउटर घरातील एखाद्या बंद खोलीत ठेवला असेल तर तुमच्या संपूर्ण घरात कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. बंद खोलीत इंटरनेटची रेंज प्रभावित होते.
कव्हर करून
जर तुम्ही घरातील एखाद्या कोपऱ्यात तुमचा वाय-फाय राउटर ठेवला असेल तर आणि त्यावर कव्हर ठेवलं असेल तर त्यामुळे वाय-फायची कव्हरेज बिघडते. म्हणून राउटर कव्हर करून ठेऊ नये.
स्वयंपाकघरात कधीच ठेऊ नये राउटर
अनेक घरांमध्ये स्वयंपाकघरात वाय-फाय राउटर ठेवला जातो. परंतु यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. किचनमध्ये अनेक धातूची होम अम्प्लायन्सेस असतात जे सिग्नल कमकुवत करू शकतात. किचनमध्ये चमचे, प्लेट्स, पॅन आणि इतर अनेक प्रकारची भांडी असतात. इतक्या प्रमाणात असलेल्या धातूच्या वस्तू सिग्नल बिघडवू शकतात आणि तुमच्या नेटवर्क स्पीड मंदावू शकतो.