Iran-Israel War: इस्रायलला अमेरिकेचे पाठबळ, इराणची ८०हून अधिक ड्रोन केली नष्ट

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्षात इस्रायलला अमेरिकेचे मोठे पाठबळ लाभले आहे. इराणने इस्रायलवर डागलेली ८०हून अधिक ड्रोन तसेच, सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अमेरिकेने हवेतच उद्ध्वस्त केली. अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने रविवारी ही माहिती दिली.

इस्रायलने सीरियामधील इराणच्या दूतावासावर १ एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात इराणचे दोन लष्करी अधिकारी ठार झाले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने इस्रायलवर शनिवारी तीनशे ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. मात्र त्यातील बहुतांश ड्रोन व क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच नष्ट केली. यानंतरही इराणने इस्रायलवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. या संघर्षात इस्रायलला अमेरिका, ब्रिटन आदी देशांचा पाठिंबा लाभला आहे.

इराणकडून इस्रायलच्या दिशेने डागलेली किमान ८० ड्रोन तसेच, सहा क्षेपणास्त्रे अमेरिकेने हवेत नष्ट केली. याशिवाय, येमेनमधील हुती दहशतवाद्यांचे नियंत्रण असणाऱ्या क्षेत्रातून होणाऱ्या माऱ्यापैकी सात ड्रोन व एक क्षेपणास्त्र अमेरिकेने प्रक्षेपणापूर्वीच नष्ट केले, अशी माहिती पेंटागॉनने दिली.
जो बायडेन यांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, नेतान्याहू करत आहेत मोठी चूक!
‘इराण सातत्याने दुर्भावनापूर्ण व बेपर्वाईची भूमिका घेत असून त्यामुळे क्षेत्रीय स्थैर्यास बाधा पोहोचत आहे. यामुळे अमेरिका व अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे. इराणच्या या घातक कारवाईपासून इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेची सेंट्रल कमांड कटिबद्ध आहे,’ असेही पेंटागॉनतर्फे सांगण्यात आले.

सत्ता असून देखील सोलापूरमध्ये उमेदवार बदलावा लागला, प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका

जी-७ देशाच्या नेत्यांनीही रविवारी इराणचा कठोर शब्दांत निषेध केला. इराणने इस्रायलवर केलेल्या या थेट हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत अनियंत्रित तणाव वाढण्याची शक्यता आहे, असे या नेत्यांनी म्हटले आहे. इराणने केलेला हा हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया इस्रायलने दिली.

Source link

international newsiran israel conflict newsIran Israel WarIran Israel War UpdatepentagonUS support israelइराण-इस्रायल संघर्ष
Comments (0)
Add Comment