रामनवमीच्या दिवशी राशीनुसार करा, भगवान श्रीरामांची पूजा आणि स्तोत्र पठण, प्रत्येक त्रासातून मिळेल मुक्ती !

मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे मेषी राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्र वाचावे. असेल केल्याने सर्व दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळेल.

वृषभ

वृषभ राशीच्या स्वामी शुक्र आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम स्तुती पाठाचे वाचन करावे. असे केल्याने श्रीरामाची कृपा राहील आणि तुमच्या भौतिक सुखसुविधांत वाढ होईल.

मिथुन

मिथुन राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी इंद्र कृत श्रीरा स्तोत्राचे वाचन करावे. असे केल्याने नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल आणि बौद्धिक विकास होईल.

कर्क

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी श्री सीता राम अष्टकमचे वाचन करावे. असे केल्याने तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि यश, सन्मानात वृद्धी होईल.

सिंह

सिंहचा राशी स्वामी सूर्यदेव आहे, त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी आज राम नवमीच्या दिवशी श्री सीता राम अष्टकमचे वाचन करावे. असे केल्याने तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि यश, सन्मान यात वृद्धी होईल.

कन्या

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना रामनवमीच्या दिवशी श्री राम मंगलाशासनम स्तोत्र वाचावे. असे केल्याने बुद्धी, ज्ञान यात वृद्धी होईल आणि सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्ती मिळेल.

तूळ

तुला राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी श्रीराम प्रेम अष्टकमचे वाचन करावे. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळे आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री रामचंद्र अष्टकमचे पठण करावे. असे केल्याने पराक्रमात वृद्धी होईल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

धनू

धनूचा राशी स्वामी गुरू आहे त्यामुळे धनू राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी जटायू कृत श्रीराम स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने ज्ञान आणि भाग्य यात वृद्धी होईल आणि तुम्हाला आरोग्यप्राप्ती होईल.

मकर

मकर राशीचा स्वामी न्यायाचा देवता शनीदेव आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी श्री राम रक्षा स्तोत्र आणि आदित्य हृदय स्तोत्र यांचे वाचन करावे. असे केल्याने जीवनात प्रगाती होईल आणि अडचणी दूर होतील.

कुंभ

कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्र कवच आणि सुंदर कांड यांचे पठण करावे. असे केल्याने सर्व दुःख नाहीशी होतील आणि जीवनात आनंद राहील.

मीन

मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी बालकांड आणि अयोध्या कांड यांचे पठण करावे, ते शुभ राहील. असे केल्याने धन, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल आणि नशिब तुमची सर्व क्षेत्रात मदत करेल.

Source link

chaitra ram navami 2024puja shubh muhuratram navamiram navami 2024अयोध्याजय श्रीरामराम जन्मोत्सवराम नवमी कधी आहे?रामनवमी
Comments (0)
Add Comment