फक्त सेल्फी कॅमेरा नव्हे या विवो फोनची बॅटरी देखील आहे दमदार; Vivo T3x 5G फोन भारतात लाँच

कमी बजेटमध्ये दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असणाऱ्या युजर्ससाठी विवो नवीन डिवाइस घेऊन आली आहे. ब्रँडनं भारतीय बाजारात आपल्या T3 सीरीज प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Vivo T3x 5G फोन लाँच केला आहे. हा १५ हजारांच्या आत युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेट, ५० मेगापिक्सल रियर कॅमेरा, ६.७२ इंचाची मोठी स्क्रीन आणि ६०००एमएएचची बॅटरी असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊया याची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन.

Vivo T3x 5G चे स्पेसिफिकेशन्स

नवीन मोबाइल Vivo T3x 5G मध्ये युजर्सना ६.७२ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि हाय रेजोल्यूशन मिळतो. ही स्क्रीन पंच होल डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. ब्रँडनं यात परफॉर्मन्ससाठी Vivo T3x 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. हा चार नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. ज्यात २.२गिगाहर्टझचा हाय क्लॉक स्पीड मिळतो.

Vivo T3x 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनसह बाजारात लाँच झाला आहे. ज्यात ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज आणि ६जीबी रॅम व १२८जीबी ऑप्शनचा समावेश आहे. तसेच डिव्हाइसमध्ये रॅम वाढवण्यासाठी व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीचा देण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्सना सुमारे १२जीबी पर्यंत रॅमची ताकद मिळते. Vivo T3x 5G मोबाइल अँड्रॉइड १४ वर चालतो.

कॅमेरा फीचर्स पाहता डिव्हाइसमध्ये युजर्सना ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी युजर्सना ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Vivo T3x 5G फोनची बॅटरी याला आणखी पावरफुल बनवते कारण यात ६०००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही झटकन चार्ज करण्यासाठी कंपनीनं ४४वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.अन्य फीचर्स पाहता, Vivo T3x 5G डिवाइस आयपी६४ रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, ४जी, ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे अनेक ऑप्शन्स आहेत.

Source link

6000mah battery phone6000mah battery phone vivo t3x 5gvivo t3x 5gविवोविवो टी३एक्सविवो फोन
Comments (0)
Add Comment