Indonesia Landslide: इंडोनेशियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता

वृत्तसंस्था, तारा तोराजा (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण बेपत्ता आहेत. दक्षिण सुलावेसी प्रांतातील ताना तोराजा जिल्ह्यात शनिवारी रात्री आजूबाजूच्या टेकड्यांवरून चार घरांवर चिखलाचा ढिगारा पडला, असे स्थानिक पोलिस प्रमुख गुनार्डी मुंडू यांनी सांगितले. एका बाधित घरात कौटुंबिक कार्यक्रम सुरू होता, असे त्यांनी सांगितले.

दुर्गम, डोंगराळ भागातील मकाले आणि दक्षिण मकाले या गावांमध्ये लष्कराचे जवान, पोलिस आणि स्वयंसेवक शोधकार्यात सहभागी झाले. रविवारी पहाटे बचावकर्त्यांना आठ वर्षांच्या मुलीसह दोन जखमी नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, असे मुंडू यांनी सांगितले. रविवारी दुपारपर्यंत बचावकर्त्यांनी मकाले गावात किमान ११ मृतदेह आणि दक्षिण मकालेमध्ये ३ मृतदेह बाहेर काढले. आणखी तीन वर्षांच्या मुलीसह इतर तिघांचा शोध सुरू आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले.

निलेश लंकेंची जनसंवाद यात्रा, कार्यकर्त्यांसह भोजन अन् मंदिरातच मुक्काम

प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे येत होते, असे मुहारी म्हणाले. मोसमी पावसामुळे इंडोनेशियामध्ये वारंवार भूस्खलन होतात, तसेच पूरही येतात.

Source link

floodIndonesia earthquakeindonesia landslideIndonesia Landslide updateindonesia rainsnatural disastervictimsइंडोनेशियात भूस्खलन
Comments (0)
Add Comment