6 महिन्यांत मुंबईतील Airtel युजर्सच्या संख्येत घवघवीत वाढ, कमी किमतीचे 5G मोबाईल ठरताय कारण

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने मुंबईत त्यांचे तब्बल 30 लाख यूजर्स असल्याचे जाहीर केले आहे. नुकतीच कंपनीने आपली 5G सेवा मुंबईतील सर्व ठिकाणी यशस्वीपणे सुरू केली आहे, यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील पुढील जनरेशनची बरोबरी कंपनीने केली आहे.

मुंबईतील एअरटेल यूजर्सची संख्या गेल्या सहा महिन्यांत लक्षणीयरित्या वाढली आहे. कंपनीने संपूर्ण मुंबई शहरात दर्जेदार सेवा पुरवून ग्राहकांना आकर्षित केले आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया सारख्या प्रतिष्ठित ऐतिहासिक स्थळांपासून ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सिद्धिविनायक मंदिरापर्यंत आणि मरीन ड्राइव्ह, वांद्रे बँडस्टँड आणि वांद्रे वरळी सी लिंक यांसारख्या शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी, एअरटेल संपूर्ण मुंबईत सक्रियपणे सेवा प्रदान करत आहे.

एअरटेल कंपनीच्या या यशावर भाष्य करताना, भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य कांकरिया यांनी सांगितले की, मुंबई नगरातील अधिकाधिक लोकांपर्यंत 5G नेटवर्क पुरवण्यासाठी वेळोवेळी महत्त्वाचे पावले उचलत आहे. अनलिमिटेड 5Gचा आनंद घेण्यासाठी अपग्रेड केले आहे कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सेवा आणि अत्याधुनिक नेटवर्कशी सतत कनेक्ट राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

देशभरात 5G सेवा पोहचण्यासाठी आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे. यात युजर्सपर्यंत लवकर ही सेवा पोहोचण्यासाठी या कंपन्या प्रयत्नशील आहेत. वापरकर्त्यांना परवडणारी 5G उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी, Airtel ने Poco सोबत 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 5G स्मार्टफोन ऑफर केले आहे. या निर्णयामुळे देशातील Airtel 5G ग्राहकांच्या एकूण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, या भागात किरकोळ दुकानांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्राहकांना 5G सेवेशी सोयीस्करपणे कनेक्ट होण्यास मदत मिळत आहे.

Source link

airtel 5gairtel user in mumbaiairtel users 5g servicesmumbai telecomtelecom companies
Comments (0)
Add Comment