ऑस्ट्रेलियात शॉपिंग सेंटरमध्ये हल्ला, ६ जणांची भोसकून हत्या; महिला पोलिसाने हल्लेखोराला केले ठार

वृत्तसंस्था, सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका शॉपिंग सेंटरमध्ये सशस्त्र हल्लेखोराने चाकूने भोसकून सहा जणांची हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर, या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले. या हल्ल्यामध्ये एका नऊ महिन्यांच्या बाळासह आठ जण जखमी झाले आहेत.

सिडनीच्या पूर्व उपनगरातील बाँडी जंक्शन येथील वेस्टफील्ड शॉपिंग सेंटरमध्ये ४० वर्षीय संशयिताने लोकांवर चाकूचे वार करायला सुरुवात केली. यात पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यानंतर एका महिला पोलिस अधिकाऱ्याने प्रसंगावधान राखून त्याच्यावर गोळी झाडली, अशी माहिती न्यू साउथ वेल्सचे सहायक पोलिस आयुक्त अँथनी क्रूक यांनी सांगितले. यात हल्लेखोर मारला गेला. हा हल्लेखोर एकटाच होता, त्यामुळे शॉपिंग सेंटरमधील धोका संपुष्टात आला आहे, असे त्यांनी सांगितले. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमी असलेल्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

महिला आयोग नुसतं जपानी साडी, नायझेरियन लिपस्टिक अन् इजिप्तच्या बांगड्या मिरवण्यासाठी नाही : सुषमा अंधारे

हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हल्लेखोराची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही. त्याने हा हल्ला का केला, याचा तपास सुरू आहे. या शॉपिंग सेंटरजवळ अनेक रुग्णवाहिका तसेच पोलिसांची वाहने दाखल झाल्याची, तसेच मॉलबाहेर पडणाऱ्या लोकांची रीघ लागल्याची दृष्ये व्हिडीओंमध्ये दाखवण्यात आली. या ठिकाणी जखमींवर उपचार केले जात असल्याचेही दिसून आले.

एकटीने हल्लेखोराला रोखले

शॉपिंग मॉलमध्ये या हल्लेखोराला रोखणारी महिला पोलिस निरीक्षक ही वरिष्ठ अधिकारी असून, घटना घडली त्यावेळी ती एकटी होती. घटनास्थळी दाखल होताच तिथे लगेचच हल्लेखोराला रोखले, या अधिकाऱ्याच्या अतुलनीय शौर्यामुळे कित्येकांचे जीव वाचले, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Source link

australia mall attackinternational newssupermarket attacksydneySydney shopping centerSydney Shopping Mall AttackSydney Shopping Mall Attack deathसिडनी शॉपिंग सेंटर
Comments (0)
Add Comment