Kenya Floods: पुरामुळे केनियामध्ये तेरा जणांचा मृत्यू, पंधरा हजार नागरिक विस्थापित

नैरोबी : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केनियाच्या विविध भागांत किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. आगामी जूनपर्यंत आणखी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

अंदाजे १५ हजार नागरिक विस्थापित

पुरामळे सुमारे वीस हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. मार्चमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे अंदाजे १५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयाने केनिया रेड क्रॉस सोसायटीचा हवाला देत सांगितले. मागील पावसाळ्यातील पुरामुळेही हजारो लोक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद!

उत्तर केनियातील गारिसारोडसह पाच प्रमुख रस्त्यांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. मंगळवारी ५१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस वाहून गेली. यातील सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे, असे ‘केनिया रेड क्रॉस सोसायटी’ने असोसिएटेड प्रेसला सांगितले. केनियाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने लामू, ताना नदी आणि गारिसा काउंटीमधील रहिवाशांना पुराचा इशारा जारी केला आहे. ताना नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील ४७ पैकी नऊ प्रांतांमध्ये पूरपरिस्थिती आहे. मंगळवारी नारोक काउंटीमध्ये चार जण ठार झाले होते.

Source link

kenya floodsKenya Floods 2024Kenya Floods deathkenya weather forecastweather forecastकेनियात पूर
Comments (0)
Add Comment