पण आता कंपनी थर्ड पार्टी ॲप्सवरून यूट्यूब जाहिराती ब्लॉक करणाऱ्या युजर्सवर कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. तसेच, आता कंपनीने ॲड-ब्लॉकर वापरणाऱ्या युजर्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे YouTube पाहणाऱ्या युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. अलीकडेच कंपनीने लॉन्च केलेल्या अपडेटमध्ये ॲड-ब्लॉकरचा वापर करणाऱ्या युजर्सला व्हिडीओज सहजासहजी बघता येणार नाही.
थर्ड पार्टी ॲड ब्लॉकरवर बसेल चपराक
थर्ड पार्टी ॲड ब्लॉकर विषयी कंपनीने गांभीर्याने कारवाई करण्याचे ठरवले आहे. टेक क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी YouTubeने दिलेल्या नवीन अपडेटमध्ये ॲड-ब्लॉकर युजर्सला बराच काळ बफरिंगचा सामना करावा लागत आहे.
YouTubeने सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या या नियमाचे उल्लंघन केल्यास या युजर्सवर बंदी घालण्यात येणार आहे. यानंतर या युजरला युट्यूबचा वापर करता येणार नाही. YouTube ने वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube Premium चे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या आवडीचा व्हिडीओ बघण्यासाठी प्रिमियमचा वापर करावा लागेल.