राजधानी तैपेई शहर सकाळी ८च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे हादरले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.२ नोंदवली गेली. या हादऱ्यांनंतर शाळांच्या इमारती रिकाम्या करण्यात येऊन विद्यार्थ्यांना खुल्या मैदानात आणण्यात आले. या भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणारी हुआलियन काउंटीमधील पाचमजली इमारत ४५ अंश कोनात झुकल्याचे दिसून आले. काही क्षणातच या इमारतीचा पहिला मजला कोसळला. तारोको नॅशनल पार्कमध्ये खडक कोसळून तीन हायकर्सचा मृत्यू ओढवला आणि त्याच भागात वाहनावर दगड आदळल्याने एका व्हॅन चालकाचा मृत्यू झाला, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले.
भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. परंतु नंतर तो मागे घेण्यात आला. ४ मॅग्निट्यूडचा तुलनेने सौम्य भूकंप अपेक्षित असल्याने इशारा देण्यात आला नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भूकंपाचा धक्का बसल्यावर १५ मिनिटांनंतर योनागुनी बेटाच्या किनाऱ्यावर सुमार ३० सेंटीमीटर उंचीची त्सुनामी लाट दिसून आली. इशिगाकी आणि मियाको बेटांवर याहून कमी उंचीच्या लाटा दिसल्या, असे जपानच्या हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
शांघाय आणि चीनच्या आग्नेय किनारपट्टीलगतच्या अनेक प्रांतांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, असे वृत्त चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिले. चीननेही त्सुनामीचे इशारे दिले होते. परंतु बुधवारी दुपारनंतर ते मागे घेण्यात आले.
भूकंपानंतर निर्माण झालेले घबराटीचे वातावरण ओसरल्यावर तैपेईमध्ये दुपारनंतर तैपेईतील बैतोऊ येथील मेट्रो स्थानक पुन्हा एकदा नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांनी गजबजून गेले होते.