जे त्यांचे पेटीएम अकाउंट वापरत नाहीत आणि त्यांचे संपूर्ण डीटेल्स येथून डिलीट करू इच्छितात, त्यांनी हे जाणून घ्यावे की, त्यातून सर्व डीटेल्स हटवले जाऊ शकत नाहीत. परंतु तुम्ही तुमची काही माहिती जसे, केवायसी डीटेल्स, पेमेंट हिस्ट्री, ॲड्रेस, मोबाईल नंबर आदी डिलीट करू शकता. ही माहिती कशी डिलीट करायची याबद्दल येथे माहिती देत आहोत.
तुम्ही खालील माहिती डिलीट करू शकता
तुम्ही खालील माहिती डिलीट करू शकता
- केवायसी डीटेल्स -तुम्ही तुमचे केवायसी तपशील जसे की आधार, पॅन कार्ड आणि बँक खाते माहिती हटवू शकता.
- पेमेंट हिस्ट्री-तुम्ही तुमची पेमेंट हिस्ट्री डिलीट करू शकता.
- ॲड्रेस – तुम्ही तुमचे सेव्ह केलेले ॲड्रेस हटवू शकता.
- मोबाईल नंबर- तुम्ही तुमच्या पेटीएम खात्याशी संबंधित मोबाईल नंबर डिलीट करू शकता.
अनावश्यक डीटेल्स रिमूव्ह करण्याच्या स्टेप्स जाणून घेऊया.
केवायसी डीटेल्स रिमूव्ह करण्याच्या स्टेप्स
- पेटीएम ॲप उघडा आणि’प्रोफाइल’ वर जा.
- ‘KYC’ सेक्शनमध्ये जा.
- ‘रिमूव्ह केवायसी’ बटणावर क्लिक करा.
- कन्फर्म करण्यासाठी तुमचा पेटीएम पासवर्ड एंटर करा.
पेमेंट हिस्ट्री रिमूव्ह करण्याच्या स्टेप्स
- पेटीएम ॲप उघडा आणि ’पासबुक’ वर जा.
- तुम्हाला हटवायचे असलेले ट्रँजॅक्शन निवडा.
- ‘ऍड’ बटणावर क्लिक करा आणि ‘रिमूव्ह ट्रँजॅक्शन’ निवडा.
- कन्फर्म करण्यासाठी तुमचा पेटीएम पासवर्ड एंटर करा.
ॲड्रेस रिमूव्ह करणे
- पेटीएम ॲप उघडा आणि ’प्रोफाइल’ वर जा.
- ॲड्रेस सेक्शनमध्ये जा.
- तुम्हाला हटवायचा असलेला ॲड्रेस निवडा.
- ‘ॲड्रेस रिमूव्ह’ बटणावर क्लिक करा.
- कन्फर्म करण्यासाठी तुमचा पेटीएम पासवर्ड एंटर करा.
मोबाईल नंबर रिमूव्ह करणे
- पेटीएम ॲप उघडा आणि ‘प्रोफाइल’ वर जा.
- ‘सेफ्टी सेटिंग्ज’ सेक्शनमध्ये जा.
- ‘चेंज मोबाईल नंबर’ ऑप्शनवर क्लिक करा.
- ‘नवीन मोबाईल नंबर’ फील्डमध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका.
- जुन्या मोबाईल नंबरवरून मिळालेला OTP टाका.
- ‘कन्फर्म’बटणावर क्लिक करा.
ॲडिशनल इन्फॉर्मेशन
तुम्हाला तुमची सर्व माहिती हटवायची असल्यास, तुम्हाला पेटीएम कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही तुमची माहिती हटवल्यानंतरही Paytm कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांसाठी काही माहिती स्टोअर करू शकते.