‘Ingenuity’ हे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर उड्डाण करणारे प्रथम रोवरक्राफ्ट होते. ते कोसळल्याचे समजतात NASAच्या जेट प्रोपल्शन लेबोरेटरी (JPL)मध्ये बैठक पार पडली. रिपोर्ट्सनुसार हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर ही बैठक झाली.
JPL मधील इन्जनूइटी टीमचे प्रमुख जोश अँडरसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे कौतुकास्पद आहे की मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर 1,000 पेक्षा जास्त दिवस, 72 फ्लायबाय आणि एक हार्ड लँडिंग केल्यानंतर, अजूनही ते संशोधनासाठी उपयोगी ठरते आहे. या समर्पणाबद्दल धन्यवाद. या हेलिकॉप्टरने आपले संपूर्ण समर्पण दिले आहे. भविष्यातील मोहिमांसाठी हे एक प्रेरणा ठरणार आहे.
वेदर स्टेशन म्हणून ठरेल उपयोगी
महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॅश नंतरही हे हेलिकॉप्टर वेदर स्टेशनच्या स्परूपात जिवंत आहे. इन्जनूअटीने फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर लँडिंग केले होते.
कोणत्याही रोटरक्राफ्टसाठी मंगळावर उड्डाण करणे अवघड आहे कारण तेथील गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा एक तृतीयांश कमी आहे. असे असुनही इन्जनूअटीने खूप चांगले काम केले. त्याच्या 72 फ्लाइट्समध्ये, त्याने एकूण 129 मिनिटे ग्रहावर उड्डाण केले आणि 17 किलोमीटरचा एकूण प्रवास केला. हे शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा 14 पटीने जास्त होते.
कोट्यवधी डॉलर्सचा खर्च
NASAनं गेल्या महिन्यात हे मिशन समाप्त झाल्याची घोषणा केली होती. हेलिकॉप्टर मंगळवार कार्यरत असतांना शास्त्रंज्ञांना अनेक महत्त्वाच्या लीड्स मिळवून देण्यात यशस्वी ठरले होते. या मिशनवर साधारणपणे ८५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च झाला आहे.