हे खरंय? आता तुमची जागा घेईल AI, तुमच्या वतीने क्लोन अटेंड करेल मिंटिंग्ज, दिसायला आणि बोलायलाही असेल तंतोतंत तुमच्यासारखाचं

आता तुमचा डिजिटल क्लोन तुमच्या वतीने मीटिंगला उपस्थित राहणार आहे. ही एक भाकड कथा वाटत असली तरी ती अगदी खरी आहे. डेल्फी एआय नावाची कंपनी लोकांना त्यांचे डिजिटल क्लोन तयार करण्याची. सुविधा प्रदान करण्याची योजना आखत आहे. तया डिजिटल क्लोनमुळे एकावेळी दोन ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहता येईल. तुमच्या आवाजाची टेस्टिंग करुन या सॉफ्टवेअरमध्ये त्याची प्रतिकृती तयार करण्यात येते.

डिजिटल क्लोनिंग म्हणजे काय?

सोप्या भाषेत, डिजिटल क्लोनिंग म्हणजे एआय, मशीन लर्निंग आणि कंप्यूटर ग्राफिक्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची डिजिटल प्रतिकृती किंवा डुप्लिकेट तयार करणे. डिजिटल क्लोनिंगमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो जसे की:

3D मॉडेलिंग आणि ॲनिमेशन: एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे डिजिटल मॉडेल तयार करणे, मॅनिपुलेशन आणि ॲनिमेशन तयार करणे.

डीपफेक टेक्नोलॉजी: हे तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ किंवा फोटोजमध्ये व्यक्तीशी तंतोतंत जुळणारे डुप्लिकेट तयार करण्यात येते

वर्चुअल अवतार: गेम किंवा मॉडेल्समध्ये व्यक्तीचा डिजिटल अवतार तयार करणे

डिजिटल ट्विन्स: सिम्युलेशन, टेस्टिंग या ऍनालिसिस करुन लिए फिजिकल ऑब्जेक्ट, सिस्टम किंवा प्रोसेसचा वर्चुअल रेप्लिका तयार करणे

कॅज्युअल युजर्साठी फ्री

डेल्फी AI कॅज्युअल युजर्सला पूर्णपणे फ्री वापरता येणार आहे. मात्र काही निवडक फिचर्स हवे असल्यास २९ ते ३९९ डॉलर्सचे मंथली सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.

सुरक्षेवर कंपनी करणार काम

कोणत्याही AI तंत्रज्ञानाप्रमाणे, यामुळे सुरक्षा आणि प्रायव्हसी गमावण्याची भीती आहे. या तंत्रज्ञानाचा धोका लक्षात घेऊन अनअधिकृत प्रवेश टाळण्यासाठी युजर्सला आधी आपली योग्य ओळख पटवावी लागेल. त्यानंतरच क्लोनिंग प्रक्रिया सुरू केली जाईल.

Source link

ai replace humanai technology dangersai technology deepfakedigital cloningMachine Learning
Comments (0)
Add Comment