AI फिचर्ससह सुसज्ज असलेले Nothingचे दोन इअरबर्ड्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Nothing Ear आणि Nothing Ear (a) या इअरबर्ड्सला भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या इअरबर्ड्समध्ये ट्रांसपेरेंट डिजाइन बघायला मिळणार आहे. तसेच, इतर डिजाईन मात्र आधीप्रमाणेच ठेवण्यात आल्या आहेत. Nothing Ear (a)बद्दल बोलायचे झाल्यास, ते एक अफोर्डेबल वेरियंट आहे, जे नवीनतम डिजाईनसह येईल. खास गोष्ट म्हणजे नथिंग इअरबर्ड्समध्ये चॅट जीपीटीचे फिचर देण्यात आले आहे. शिवाय यात येलो रंगाचे ऑप्शन मिळेल जे दिसायला आकर्षक दिसेल.

किंमत आणि ऑफर्स

Nothing Ear इअरबर्ड्सची 11,999 रुपये इतकी आहे. 29 एप्रिलपासून त्याची विक्री सुरु होणार होईल. तर Nothing Ear (a) ची किंमत 7,999 असेल. हे 22 एप्रिल पासून खरेदी करता येईल. हे इअरबर्ड्स तुम्ही फ्लिपकार्ट व क्रोमाइथंनं खरेदी करू शकता. स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला हे 5,999 पर्यंतच्या सवलतीत खरेदी करता येईल.

स्पेसिफिकेशन्स

  • इअरबर्ड्समध्ये अतिशय क्लिअर साऊंड मिळेल. यात ड्युअल चेंबर डिझाइन आहे. एअरफ्लोसाठी दोन अतिरिक्त व्हेंट प्रदान केले आहेत. इअरबर्ड्स LHDC 5.0 आणि LDAC कोडेक सपोर्टसह येतात.
  • ब्लूटूथद्वारे यात हाय रिझोल्युशन स्ट्रीमिंगची सुविधा देण्यात आली आहे. इअरबर्ड्स नथिंग ॲपशी कनेक्ट केले जाऊ शकतात. इअरबर्ड्समध्ये उत्तम ANC फीचर देण्यात आले आहे. यामध्ये नॉईज कॅन्सलेशन फीचर देण्यात आले आहे. यात हाय, मिडीयम आणि लो असे तीन ऑटोमॅटिक नोइज कॅन्सलेशन देण्यात आले आहे. इअरबर्ड्समध्ये 45 डीबी नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे.
  • नथिंग इअरमध्ये कस्टम 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर आहे. हे ब्लूटूथवर हाय रिझोल्यूशन स्ट्रीमिंगसाठी LHDC 5.0 आणि LDAC कोडेकला सपोर्ट देईल. नथिंग इअरमध्ये व्हॉईस प्रोफाईल तयार करणे, इक्वेलायझर, एएनसी कंट्रोल आणि इतर फिचर्स प्रदान केली जातील

Source link

ai featuresEarBirdsindia launchNothing Earprice
Comments (0)
Add Comment