दहा लाख अफगाणी नागरिकांना मायदेशी पाठवणार, पाकिस्तानचा निर्णय

इस्लामाबाद : पाकिस्तानानात बेकायदा पद्धतीने आलेल्या अफगाण नागरिकांची संख्या किती हा प्रश्न अनुत्तरित असला, तरी कागदपत्रे असलेल्या सुमारे दहा लाख अफगाण नागरिकांना मायदेशी पाठवण्याचा दुसरा टप्पा पाकिस्तानी प्रशासन लवकरच सुरू करणार आहे. माहिती संकलन सुरू अफगाण सिटिझन कार्ड (एसीसी) असलेल्या व्यक्तींचा ठावठिकाणा शोधून, त्यांची माहिती संकलित करण्याचा आदेश पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिला होता. त्यासाठी २५ मार्च ही अंतिम मुदत होती, असे ‘डॉन’ वृत्तपत्राने म्हटले आहे.

एप्रिलअखेर सर्वेक्षण कागदपत्रे नसलेल्या अफगाण नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी पाकिस्तानने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोहीम राबवली होती. आता ‘एसीसी’धारक अफगाण नागरिकांना पाकिस्तान मायदेशी पाठवणार आहे. या व्यक्तींची मॅपिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे खैबर पख्तुनख्वाचे अतिरिक्त मुख्य सचिव आबिद माजीद यांनी सांगितले. ३० एप्रिलपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. २०२१नंतर आणखी स्थलांतर अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट २०२१मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अफगाण नागरिक पाकिस्तानात आले आहेत. त्यांची संख्या सुमारे सहा लाख ते आठ लाख सांगितली जाते. निर्वासितांची संख्या किती? पाकिस्तानात सुमारे २१ लाख ८० हजार कागदपत्रधारक अफगाण निर्वासित आहेत. यातील १३ लाख निर्वासितांकडे २००६-०७मध्ये झालेल्या जणगणनेनुसार नोंदणीचा पुरावा असलेले कार्ड आहे. याशिवाय आठ लाख ८० हजार निर्वासितांकडे २०१७मधील नोंदणी मोहिमेनंतरचे ‘एसीसी’ आहे.

Source link

afgani rufuggiesagfani citizenspak afgan conflictpakistan newsअफगाणिस्तान न्यूजपाकिस्तान न्यूज
Comments (0)
Add Comment