Fact Check: दैनिक भास्करच्या सर्व्हेत INDIA ला १० राज्यात आघाडी? व्हायरल पोस्टचं सत्य काय?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी दैनिक भास्करचा एक सर्व्हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्व्हेमध्ये केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूसह १० राज्यांमध्ये INDIA आघाडीला फायदा होताना दिसत आहे आणि भाजप युती सत्तेबाहेर होत असल्याचं दिसत आहे. दैनिक भास्करच्या या कथित व्हायरल सर्वेक्षणाचे पेपर कटिंग अनेक युजर्सनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात INDIA आघाडीचा दावा करण्यात आला होता. पोस्टची आर्काइव लिंक इथे, इथे पाहता येईल.

पेपरचं हेच व्हायरल झालेलं कात्रण तेलंगणातील एका काँग्रेस सदस्यानेही एक्सवर शेअर केलं आहे. त्यांनी लिहिले की, १० राज्यांमध्ये काँग्रेसची स्पष्ट आघाडी आहे. दैनिक भास्कर-नेल्सनचे सर्वेक्षणः भारतीय आघाडी दहा राज्यांमध्ये पुढे आहे आणि केवळ या दहा राज्यांमध्ये २०० चा टप्पा ओलांडण्याची क्षमता आहे. मोदींची प्रतिष्ठा भाजपला मतं मिळवून देण्यासाठी अपुरी आहे. महाराष्ट्र, बंगाल आणि बिहारमधून वॉशआउटची चाचणी एनडीएकडून तपासण्यात येत आहे.
Fact Check: DMK कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्याला मारहाण केली? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?

Logically Facts ने या सर्वेक्षणाची तपासणी केली असता, त्यात असे कोणतेही सर्वेक्षण अर्थात सर्व्हे आढळला नाही. याशिवाय दैनिक भास्करनेही या व्हायरल झालेल्या कात्रणाला बनावट असल्याचं म्हटलं असून वृत्तपत्र अशा कोणत्याही मजकुरावर दावा करत नसल्याचं म्हटलं आहे.

पडताळणीत काय समोर आलं?

लॉजिकल फॅक्ट्सने तपास पुढे नेला तेव्हा त्याचे लक्ष व्हायरल पेपरच्या तारखेकडे गेले. जे १३ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या भोपाळ आवृत्तीचे पहिले पान होते. त्यानंतर त्यांच्या टीमने दैनिक भास्करच्या वेबसाइटवर त्याच तारखेचा ई-पेपर शोधला, त्यानंतर जे चित्र समोर आले ते व्हायरल झालेल्या पेपरच्या कात्रणापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. ई-पेपरचं पहिलं पान व्हायरल झालेल्या कटिंग पेपरशी अजिबात जुळलेलं दिसलं नाही.

व्हायरल झालेल्या पेपरच्या कात्रणात जिथे सर्व्हे दिसतो आहे, वास्तविक ई-पेपरमध्ये त्या ठिकाणी जात, जनगणना आणि पावसाचं वृत्त दिसतं आहे. अशा परिस्थितीत हे सिद्ध होतं, की समाजकंटकांनी हे फेक चित्र बनवून निवडणुकीच्या काळात व्हायरल केलं आहे.

लॉजिकल फॅक्ट्सच्या टीमने ज्यावेळी दैनिक भास्करच्या सर्व्हेचे कीवर्ड गुगलवर सर्च केले तेव्हा त्यांना १४ एप्रिल रोजी प्रकाशित झालेला एक रिपोर्ट सापडला. ज्यात मतदारांच्या मनःस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी दैनिक भास्करने स्वत:च्या सर्व्हेचे निकाल दाखवले होते, जे सात दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले होते आणि त्यात आठ लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला होता.

राज्यातील भाजप नेते कुचकामी, अंबादास दानवेंची टीका; इंडिया आघाडीचा आधार चव्हाणांकडून प्रत्युत्तर!

निष्कर्ष

Logically Facts तपासणीत, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा सर्व्हे खोटा आहे. दैनिक भास्करने असा कोणताही सर्व्हे प्रसिद्ध केलेला नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत अपप्रचारासाठी पेपरचं ते कात्रण व्हायरल केलं जात आहे.

This story was originally published by Logically Facts, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

dainik bhaskar fake survey fact checkfact check INDIA lok sabha 2024fact check newslok sabha election 2024दैनिक भास्कर फेक सर्व्हे फॅक्ट चेकफॅक्ट चेकलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment