त्याला वाटलं पोटदुखी, पण पोटात १२ इंचाच्या जिवंत मासा अन्… भयंकर घटनेने डॉक्टरांना शॉक

व्हिएतनाम: व्हिएतनामच्या उत्तर क्वांग निन्ह प्रांतात राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीसोबत एक विचित्र घटना घडली आहे. पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन तो डॉक्टरांकडे गेला होता. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या पोटात काही अडकल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड केल्यानंतर असं काही आढळून आले की डॉक्टरांनाही शॉक लागला. ही वस्तू त्या व्यक्तीच्या आतड्यांमध्ये घुसली होती आणि आतड्यांना फाडून ती त्याच्या पोटात शिरली होती.

डेली मेल (Ref) च्या रिपोर्टनुसार, यामुळे त्याला पेरिटोनिटिस (Peritonitis) नावाचा गंभीर आजार झाला होता. ज्यामध्ये पोटाच्या आतील थराला सूज येते. या जीवघेण्या अवस्थेतून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्याच्या पोटात डॉक्टरांना एक जिवंत मासा आढळून आला, जो सुमारे ३० सेंटीमीटर लांब होता.

हा मासा त्या व्यक्तीच्या गुदद्वारातून त्याच्या शरीरात शिरला आणि त्याच्या आतड्यांपर्यंत पोहोचला, असे डॉक्टरांचे मत आहे. डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक हा मासा आणि त्याच्या आतड्यांचा खराब झालेला भाग काढून टाकला. हाय हा जिल्हा वैद्यकीय केंद्राचे डॉक्टर फाम मान हंग यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, गुदद्वाराच्या भागात खूप घाण असते आणि त्यामुळे संसर्गाचा धोका असतो. पण, सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

या व्यक्तीला पेरिटोनिटिस होण्याचे हे एक विचित्र कारण आहे. परंतु हा एक गंभीर आजार आहे. ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्याची लक्षणे दुर्लक्षित केली जाऊ शकत नाहीत, असा तज्ञांचं मत आहे.

Source link

Alive Fish At StomachDoctors Found Alive fish at stomachPeritonitis Diseasesstomach painweird newswhat is peritonitis and causesपोटदुखीपोटात जिवंत मासा
Comments (0)
Add Comment