इतकंच नव्हे तर तिला याबाबत काहीही कल्पना देखील नव्हती. महिलेच्या पोटात जेव्हा असह्य वेदना होऊ लागल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
रिपोर्ट्सनुसार, डॅनिएला वेरा नावाची ८१ वर्षीय ही महिला अत्यंत विचित्र आजाराने त्रस्त होती. तिला अचानक पोटाच वेदना होऊ लागल्या. त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली असता तिच्या पोटात कॅल्सीफाईड गर्भ असल्याचे आढळून आले. सात मुलांची आई असलेल्या डॅनिएलाला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. १४ मार्च रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे तिचा गर्भ काढला. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर डॅनिएला जास्त काळ जगू शकली नाही आणि दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.
डॅनिएलावर उपचार करणारे डॉक्टर पॅट्रिक डेझिरेम यांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर झालेल्या संसर्गामुळे महिलेचा मृत्यू झाला. ते म्हणाले की, काही प्रकरणांमध्ये गर्भाशयाऐवजी शरीराच्या इतर भागात गर्भधारणा होते, याला एक्टोपिक प्रेग्नंसी म्हणतात. ही एक प्रकारची गर्भधारणाच आहे. ज्यामध्ये फर्टिलाइज्ड गर्भांच्या बाहेर गर्भधारणा होते. पण, तो गर्भ जिवंत राहण्यास सक्षण नसतो. असंच काहीसं डॅनिएलासोबत घडलं होतं.
योग्य प्रकारे गर्भाचा विकास होत नसल्यामुळे ते कॅल्सीफाईड होते. अशा परिस्थितीत, शरीरात तीव्र वेदना किंवा रक्तस्त्राव होत नाही. त्यामुळे हे कळून येत नाही. एक्स-रे होईपर्यंत शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या ५६ वर्षांपासून डॅनिएला हिला गर्भाधारणा झाली असून तिला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती.