भारतातील वृद्ध अधिक आनंदी, आनंदी देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी? जाणून घ्या

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क: जागतिक आनंदी देशांच्या यादीत १४३ देशांमध्ये भारत १२६ व्या क्रमांकावर असून, भारतातील वयोवृद्ध नागरिक आयुष्याबद्दल अधिक समाधानी असून, महिला त्याही पेक्षा अधिक आनंदी आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील तरुण अधिक आनंदी असून, मध्यमवयीन कमी आनंदी असल्याचेही त्यात म्हटले आहे.आनंदी देशांच्या यादीत फिनलंड जगात प्रथम स्थानी असून, सलग सातव्यांदा फिनलंड प्रथम स्थानावर आहे. याशिवाय डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन, इस्रायल, नेदरलँड, नॉर्वे, लक्झेम्बर्ग, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश पहिल्या १० क्रमाकांत आहेत.

आंतरराष्ट्रीय आनंदी दिनानिमित्त हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. डब्ल्यूएचआर संपादकीय मंडळ, संयुक्त राष्ट्रे शाश्वत विकास सोल्यूशन्स नेटवर्क, ऑक्सफर्ड वेलबिंग रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतापुढे लिबिया, इराक, पॅलेस्टाइन आणि निगर हे देश आहेत. अमेरिका प्रथमच पहिल्या २० क्रमांकाबाहेर गेला आहे. अफगाणिस्तान हा तळाशी आहे, तर पाकिस्तान १०८व्या क्रमांकावर आहे.

वय आणि आयुष्याचे समाधान फक्त श्रीमंत देशांमध्ये अस्तित्वात आहे या समजाला भारताने नाकारले असून, भारतात राहणीमानातून मिळणारे समाधान वृद्धत्वाशी जोडले आहे. भारतातील वयोवृद्ध नागरिक आयुष्याबद्दल अधिक समाधानी असून, महिला त्याही पेक्षा अधिक आनंदी आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Source link

global happiness indexhappiness indexindia newsnew york newsusa newsworld happiness index
Comments (0)
Add Comment