मला एकनाथ शिंदे म्हणालात तर चपलेनं हाणेन! आमदार भडकले; शेजारी राज्यात CMची चर्चा का होतेय?

हैदराबाद: मला एकनाथ शिंदे म्हणालात तर चपलेनं मारेन अशा शब्दांत तेलंगणाचे माजी मंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे आमदार हरिश राव यांनी संताप व्यक्त केला. एनटीव्ही नावाच्या वृत्तवाहिनीला राव यांनी मुलाखत दिली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी केलेल्या बंडाचा विषय निघाला. शिंदेंशी तुलना होताच राव यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लाईव्ह मुलाखतीत शिवी हासडली.

तेलंगणात गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचा पराभव झाला. तर काँग्रेसनं मुसंडी मारत ६४ जागा जिंकल्या. भारत राष्ट्र समितीच्या जागा ८८ वरुन ३९ वर आल्या. राज्यातील सत्ता त्यांना गमवावी लागली. आता लोकसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीची कामगिरी कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि बीआरएसचे आमदार हरिश राव यांनी एनटीव्हीला मुलाखत दिली.
धनुष्यबाण गायब! शिंदेंनी ‘करुन दाखवलं’; ठाकरेंना क्रॉस करण्याची संधी गेली, भाजपनं डाव साधला
आमचा पक्ष राज्यातलं काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू देईल, असं राव यांनी मुलाखतीत म्हटलं. राज्यातील तुमच्या पक्षाची अवस्था खराब आहे. त्यामुळे तुम्ही माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख केसीआर यांना सोडून जाल आणि एकनाथ शिंदे व्हाल अशी चर्चा होतेय. तसं खरंच होईल का, असा प्रश्न एका पत्रकारानं राव यांना विचारला.
भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी, शिंदे चक्रव्यूहात अडकलेत; शिलेदारानं भलीमोठी यादी वाचली
पत्रकाराचा प्रश्न ऐकताच राव भडकले. त्यांनी रागाच्या भरात शिवी हासडली. ‘माझ्यासाठी माझं चारित्र्य अतिशय महत्त्वाचं आहे. निष्ठेला माझ्या लेखी महत्त्व आहे. निष्ठा माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी २४ वर्षांपासून पक्षात आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी रेवंत रेड्डींनी पक्ष बदलला. ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले. मी तसा नाही,’ असं राव म्हणाले.

संभाजी भिडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीला

एकनाथ शिंदेंसोबत होणारी तुलना हरिश राव यांना प्रचंड खटकली. त्यांनी यावरुन थेट इशाराच दिला. ‘मला एकनाथ शिंदे म्हणालात तर चपलेनं मारेन,’ अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी राव यांचा पारा चढला होता. पक्षाची साथ सोडणार नाही. माझ्या आयुष्यात निष्ठेना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं राव यांनी स्पष्ट केलं.

Source link

Eknath ShindeHarish RaoTelanganaएकनाथ शिंदेहरीश राव
Comments (0)
Add Comment