Itel Super Guru 4G फीचर फोन भारतात १,७९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे याची खासियत म्हणजे हा फोन क्लाउड-बेस्ड YouTube सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे, त्यामुळे युजर्स आपल्या आवडीचे व्हिडीओज फोनवरील २-इंचाच्या डिस्प्लेमध्ये पाहू शकतात. यात YouTube Shorts चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी सुपर गुरु ४जी मध्ये ड्युअल ४जी सिम स्लॉट मिळतो. Itel नुसार हा ४जी कीपॅड फोन ओपन नेटवर्क लॉकिंग सिस्टमसह येतो, ज्यामुळे भारतीय बाजारातील सर्व ४जी सिम कार्डसह हा कम्पॅटिबल आहे.
Itel Super Guru 4G मध्ये १,०००एमएएचची बॅटरी मिळते, जी कंपनीच्या दाव्यानुसार संपूर्ण दिवसभराचा बॅकअप देऊ शकते. तसेच या फीचर फोनमध्ये मागे एक व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. Itel नुसार, जरी हा कॅमेरा हाय रिजॉल्यूशन नसला तरी देखील हा युजर्सना क्लीयर फोटोज कॅप्चर करण्यास मदत करतो.
सुपर गुरु ४जी मध्ये डिजिटल पेमेंट क्षमता आहे, ज्यामुळे युजर्सना युपीआयच्या माध्यमातून सहज युपीआय आधारित कामे करता येतील, ज्यात पैसे पाठवणे आणि मिळवणे, बिल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करणे इत्यादींचा समावेश आहे. यात कॉल अलर्ट फीचर देखील मिळतं. तसेच फोनमध्ये टेट्रिस सारख्या क्लासिक मोबाइल गेमचा समावेश देखील केला आहे. तसेच सुडोकू आणि इतर पझल गेम्स देखील देण्यात आले आहेत. यात युजर्स लाइव्ह क्रिकेट स्कोर देखील मिळवू शकतात आणि ताज्या बातम्या आणि वेदर रिपोर्ट देखील जाणून घेऊ शकतात.