फेसबुक जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. फेसबुकवर यूजर्सना फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची तसेच टेक्स्ट पोस्ट शेअर करण्याची मुभा मिळते. तसेच, युजर्सच्या सोयीसाठी, फेसबुकमध्ये अनेक छुपे फिचर्स देण्यात आले आहेत, ज्याबद्दल प्रत्येक यूजरला माहिती असणे आवश्यक आहे . आज आम्ही तुम्हाला फेसबुकच्या अशाच एका उपयुक्त फीचरबद्दल माहिती देणार आहोत. या फीचरच्या मदतीने तुम्ही चुकून डिलीट झालेल्या फेसबुक पोस्ट रिकव्हर करू शकता.
अनेक वेळा फेसबुकवर एखादी पोस्ट हटवायची असते, मात्र चुकून दुसरीच पोस्ट डिलीट होते. अशा परिस्थितीत तुम्ही चुकून डिलीट झालेली पोस्ट सहजासहजी रिस्टोअर करू शकाल. युजर्सच्या या समस्येची कंपनीला चांगल्या प्रकारे जाण आहे अशा परिस्थितीत, फेसबुक ॲपमध्ये एक ऑप्शन मिळेल यामुळे तुम्ही तुमची डीलिट झालेली पोस्ट पुन्हा परत मिळवू शकता.
Facebookवर डीलीट झालेली पोस्ट याप्रकारे पुन्हा रिकव्हर करता येईल.
- Facebook वर चुकून डिलीट झालेली पोस्ट पुन्हा रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे अकाऊंट ओपन करावे लागेल.
- यानंतर तुमच्या फेसबुक प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा
- तुमच्या प्रोफाईल ऑप्शनमध्ये असलेल्या मेन्यूमधील तीन डॉट्सवर क्लिक करा
- यानंतर Settings and Privacy ऑप्शनवर क्लिक करा
- Settings आणि Privacy मध्ये जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा Settings या ऑप्शनवर जावे लागेल.
- तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील, यांतर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि सेटींग मेन्यू जावे लागेल.
- Your Activity तुम्हाला Activity Log या ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
- यानंतर Trash ऑप्शनवर क्लिक करा
- या ठिकाणी, तुम्ही अलीकडेच डीलीट केलेल्या सर्व पोस्ट्स तुम्हाला दिसतील.
- तुम्ही त्या पोस्टवर टॅप करा आणि त्यापुढील दिसणाऱ्या रिस्टोअर पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमची डिलीट केलेली पोस्ट पुन्हा रिस्टोअर होईल.
अशा प्रकारे तुम्ही फेसबुकवरील डिलीट केलेल्या पोस्ट रिकव्हर करू शकाल. यासाठी तुम्हाला वेगळे थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची कोणतीही गरज नाही.