अमेरिकेत प्रवेशासाठी भारतीयांची रेल्वेतून उडी न्यूयॉर्कमध्ये तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत कॅनडामधून येणाऱ्या धावत्या मालगाडीतून उड्या मारणाऱ्या चौघांना अपस्टेट न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली. यामध्ये तीन भारतीय नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय रेल्वेमार्ग पुलावर १२ मार्चला चार जणांनी धावत्या मालगाडीतून उड्या मारल्याचे बफेलो स्थानकावर तैनात करण्यात आलेल्या अमेरिकेच्या सीमा गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. यामध्ये एका महिलेचा समावेश होता. ती जखमी झाल्याने उर्वरित तिघांनी तिला तिथेच सोडून पळ काढला, परंतु पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना अटक केली. जखमी महिलेला एरी काऊंटी शेरीफचे अधिकारी आणि अमेरिकेच्या सीमाशुल्क व सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांकडून प्रथमोपचार देण्यात आले.

उपचारानंतर तिला रुग्णवाहिकेतून स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या चौघांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. ही महिला आणि दोन पुरुष भारतातील आहेत, तर अन्य एक जण डॉमिनिकन रिपब्लिकमधील नागरिक असल्याचे समोर आले. तीन पुरुषांना बटाविया स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे. सुनावणी होइपर्यंत ते येथेच राहतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Source link

indians jump from train to enter americathree indians arrested in new yorkअमेरिकाअमेरिकेत बेकायदा प्रवेशधावत्या मालगाडीतून उडी
Comments (0)
Add Comment