Vivo V30e कधी येणार भारतात
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार Vivo V30e स्मार्टफोन २ मेला भारतात लाँच केला जाईल. या फोनच्या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर पाहता येईल.
Vivo V30e चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Vivo V30e मध्ये ६.७८ इंचाचा अॅमोलेड कर्व्ड डिस्प्ले दिला जाईल. ज्यात १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल. हा फोन कंपनी आयपी६४ रेटिंगसह सादर करू शकते. पावर देण्यासाठी Vivo V30e मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेट, ८जीबी रॅम आणि २५६जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १४ आधारित फनटच १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ५०मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ८एमपीची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स असेल. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला ३२मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. विवो व्ही३०ई मध्ये सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. तसेच, हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल.
Vivo V30e ची संभाव्य किंमत
विवोनं आतापर्यंत व्ही३०ई च्या किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही, परंतु लीक्समध्ये सांगण्यात आलं आहे की या हँडसेटची किंमत ३० हजारांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. हा फोन Silk Blue आणि Velvet Red कलरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.
गेल्या महिन्यात आलेला Vivo V30
विवो व्ही३० गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत ३३,९९९ रुपयांपासून सुरु होते. याच्या फ्रंट आणि मागे ५०एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात एचडी+ कर्व्ड डिस्प्ले मिळतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.