Google ने नुकतेच एक ब्लॉग पोस्ट लिहून म्हटले आहे की, ते Google मॅप्स आणि सर्चमध्ये इलेक्ट्रिक वाहन चालकांसाठी अनेक नवीन फीचर्स आणत आहेत. या फीचर्सच्या मदतीने, लोकांना त्यांचे वाहन चार्ज करण्यासाठी जागा सहज शोधता येईल आणि लांब प्रवासासाठी आगाऊ नियोजन देखील करता येईल
EV वाहनांसाठी Google Maps वर नवीन फीचर
इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांसाठी चार्जिंग स्टेशन शोधणे कधीकधी कठीण असते, विशेषत: अपरिचित ठिकाणी किंवा बहुमजली पार्किंग लॉटमध्ये चार्जिंग स्टेशन शोधणे अवघड होऊन बसते. ही समस्या कमी करण्यासाठी, Google मॅप्स आता AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) युजर्सच्या रिव्ह्यूमधून मिळालेल्या माहितीच्या मदतीने तयार केलेले छोटे डीटेल्स दाखवेल. या डीटेल्समध्ये, चार्जिंग स्टेशनचे अचूक स्थान आणि तेथे पोहोचण्याचा सोपा मार्ग सांगितला जाईल.
कार मॅप्समध्येही दिसतील जवळपासची EV स्टेशन
वाहनात बसवलेल्या गुगल मॅपवर आता जवळपासची चार्जिंग स्टेशन दिसतील. तेथे किती चार्जिंग पॉइंट्स रिकामे आहेत आणि वाहन किती लवकर चार्ज करता येईल हेही सांगितले जाईल. Google मॅप्स आधीपासूनच लागलेल्या असलेल्या सर्व वाहनांमध्ये हे फीचर काही महिन्यांत येईल.
हॉटेलमध्ये चार्जिंगची सुविधा आहे की नाही ते सांगेल
आता तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची सुविधा आहे हे google.com/travel वर जाऊन पाहू शकता. या नवीन फिल्टरच्या मदतीने लांबच्या प्रवासासाठी हॉटेल शोधत असताना, तेथे वाहन चार्ज करता येते की नाही हे पाहता येईल.