कंटेनरमधून विचित्र आवाज, उघडताच समोरील दृश्य पाहून अधिकारी हादरले, आठवड्याभरापूर्वीचं गूढ उकललं

फ्लोरिडा: अनेकदा आपल्या छोटा हलगर्जीपणा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. याचच एक उदाहरण सध्या पाहायला मिळालं. एका कंटेनरच्या आत असं काही सापडलं की पाहून अधिकारीही हैराण झाले. या कंटेनरमधून विचित्र आवाज येत होता. पण, या कंटेनरमध्ये असं काही असेल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. जेव्हा हा कंटेनर उघडण्यात आला तेव्हा अधिकाऱ्यांना त्यांच्या समोर जे होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता. या कंटेनरच्या आत एक महिला होती. ही महिला या कंटेनरमध्ये अडकून पडली होती. ती गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता होती.

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडातील आहे. गुरुवारी येथील एका कंटेनरमध्ये महिला आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, ५२ वर्षांच्या मार्लेनी लोपेज यांना अखेरचं सोमवारी त्यांच्या घरीच बघितलं गेलं होतं. त्या त्यांच्या मुलाला आणायसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण, नंतर त्या घरी परतल्याच नाहीत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी कुटुंबाची चौकशी केली, तसेच जवळपासच्या परिसरातही तपास केले आणि त्या बेपत्ता असल्याचे पोस्टर सगळीकडे लावले.

यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की एका शिपिंग कंटेनरमध्ये एक महिला सापडली आहे. ही महिला अजून कोणी नाही मार्लेनी लोपेज होत्या. मार्लेनी लोपेज या कंटेनरच्या दाराला ठोठावत होत्या. तेव्हा तिथे काम करणाऱ्यांपैकी एकाने त्यांचा आवाज ऐकला आणि तिथे जाऊन पाहिलं. कंटेनरचं दार उघडताच समोरील दृश्य पाहून अधिकाऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या मार्लेनी लोपेज या कंटेनरमध्ये कशा गेल्या असाच प्रश्न सर्वांना पडला होता.

त्या या कंटेनरमध्ये कशा आणि कधी फसल्या याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. कोकोआ पोलिस विभागाने लोकांना आवाहन केलं की, जर या प्रकरणात त्यांना काही माहिती मिळाली तर ती पोलिसांना द्यावी. आठवडाभरापासून बेपत्ता आणि मग अशा प्रकारे त्या कंटेनरमध्ये सापडल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे.

Source link

container homeMissing woman trapped inside containeshipping containershipping container homeWoman found in shipping containerwoman found trapped inside shipping containerफ्लोरिडाबेपत्ता महिला सापडलीशिपिंग कंटेनर
Comments (0)
Add Comment