Phone Haking: बॅटरी डिस्जार्जसह घडत असतील ‘या ७ गोष्टी’, तर समजा तुमचा फोन हॅक झालाय

इंटरनेटच्या जमान्यात फोन हॅक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश होत आहे, त्यामुळे फोन हॅक करणे सोपे झाले आहे. अशा परिस्थितीत, तुमचा फोन हॅक झाला आहे हे तुम्हाला कसे कळेल? खरं तर, आज आम्ही तुम्हाला काही चिन्हे सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही समजू शकता की तुमचा फोन हॅक झाला आहे…

बॅटरी लाइफ

तुमचा फोन वेळोवेळी चार्ज करुनही खुपदा डिस्जार्ज होत असेल तर तुम्हाला तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना हे तपासावे लागेल. अनेकदा हॅकर्स बॅकग्राउंड ऍप्सच्या मदतीने फोनवर लक्ष ठेवून असतात जर यामुळे तुमची बॅटरी लवकर ड्रेन होत असेल तर तुम्हाला मोबाईलच्या बॅटरीकडे लक्षद्यावे लागेल

फोनमधील निरुपयोगी ॲप्स

तुम्ही तुमच्या फोनमध्ये ॲप्सबद्दल डिटेल माहिती ठेवा जेणेकरून तुमच्या परवानगीशिवाय कोणतेही ॲप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल होणार नाही. असे झाल्यास फोन हॅक होऊ शकतो. या अज्ञात ॲप्समध्ये हॅकिंग सॉफ्टवेअर असू शकते.

डिवाइस ओवरहीट होणे

हेरगिरी करणारे ॲप्स सहसा यासाठी जीपीएस प्रणाली वापरून रिअल टाइममध्ये डिव्हाइसचे लोकेशन ट्रॅक करतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनच्या हार्डवेअरवर जास्त लोड येतो. त्यामुळे जास्त गरम होण्याची समस्या उद्भवत असते.

डेटा वापरात वाढ

जर तुमचा फोन कोणी ट्रॅक केला असेल तर डेटाचा वापर अचानक वाढेल. अशा परिस्थितीत डेटा वापरात अचानक वाढ होत असेल, तर तुम्ही सतर्क राहायला हवे.

फोन खराब होणे

फोन हॅक झाल्यास, स्क्रीन फ्लॅशिंग, ऑटोमॅटीक फोन सेटिंग्ज बदल किंवा फोन काम न करणे व डिव्हाइस खराब होणे यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते.

कॉल दरम्यान बॅकग्राउंड नॉइज

हॅकर्स ॲप्सद्वारे फोन कॉल रेकॉर्ड करतात. अशा परिस्थितीत, जेव्हा फोन कॉल दरम्यान कोणताही बॅकग्राउंड नॉइज ऐकू येतो तेव्हा सावध राहावे, कारण ते हॅकिंगचे लक्षण असू शकते.

अनावश्यक ब्राउझिंग हिस्ट्री

ट्रॅकिंग किंवा गुप्तचर आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक केलेल्या वेबसाइट शोधण्यासाठी आपली एकदा डिव्हाइसच्या ब्राउझिंग हिस्ट्री तपासून पाहा.

Source link

battery dischargedata privacyhackersmobile securityphone hacking
Comments (0)
Add Comment