सोनंच सोनं अन् ३२ जणांचा बळी, १२०० वर्ष जुन्या थडग्यात खजिना सापडला, पाहून सारेच शॉक

पनामा: जगात अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी पुरातत्व विभाग इतिहासाचे अवशेष शोधण्याचं काम करत असतो. अनेकदा यादरम्यान आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर येतात. तर कधी अशा काही गोष्टी सापडतात ज्यामुळे शेकडो-हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती आणि लोकांबद्दल माहिती होते. असंच काही या देशात सापडलं आहे. येथे १२०० वर्ष जुना खजिना सापडला आहे. यामध्ये सोन्यासह अनेक अशा गोष्टी सापडल्या आहेत जे पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत.

यामध्ये मोठ्याप्रमाणात सोनं आणि जवळपास ३२ मृतदेह सापडले आहेत. या ३२ जणांचा बळी देण्यात आला असावा असा अंदाज लावला जात आहे. मेट्रो युकेच्या रिपोर्टनुसार, पनामा येथे हा शोध लावण्यात आला आहे.

पनामा शहरापासून जवळपास ११० मैल लांब एल कॅनो आर्कियोलॉजिकल पार्कमध्ये हा शोध लागला आहे. यामध्ये सोन्याची शॉल, बेल्ट, दागिने आणि व्हेलच्या दातांपासून तयार करण्यात आलेले कानातले अशी अनेक मौल्यवान वस्तुंचा समावेश आहे. समाचार आउटलेटनुसार, या वस्तू कोकल संस्कृतीतील एका उच्च पदावरील व्यक्तीसोबत पुरण्यात आल्या असाव्या, असं अधिकारी मानतात. समाजाच्या प्रमुखाला मृत्यूनंतरच्या प्रवासात आराम मिळाला यासाठी ३२ जणांना बळीही देण्यात आला होता, असंही सांगितलं जात आहे. या मृतदेहांची अचूक संख्या माहिती करुन घेण्यासाठी त्यांचा पूर्ण तपास केला जात आहे. या खजिन्याची किंमत खूप जास्त आहे, असं पनामाच्या संस्कृती मंत्रालयाच्या लिनेट मोंटेनेग्रो यांनी सांगितलं.

जिथे हा खजिना सापडला ते थडगं ७५० ईसवीतील असून एका उच्चपदस्थ पुरुष नेत्यासाठी ते तयार केलं गेलं असावं, असं सांगितलं जातं. त्या पुरुषाचा मृतदेह एका महिलेच्या मृतदेहावर ठेवून पुरण्यात आला होता. ही तेव्हा अभिजात वर्गातील लोकांना पुरण्याची प्रथा होती. या थडग्यात सापडलेल्या इतर वस्तुंमध्ये बांगल्या, मानव आकृती असलेले कानातले, मगरीचा मृतदेह, घंटी, कुत्र्याच्या दातांपासून तयार करण्यात आलेले स्कर्ट, हाडांपासून तयार केलेली बांसुरी आणि मातीच्या भांड्यांचा समावेष आहे.

Source link

32 Bodies Found In Gravearchaeologistarchaeology newsGold TreasureGold Treasure Found In Gravehuman sacrificeresearch archaeologistSacrificial Victimsखजिना सापडलाथडग्यात खजिनानरबळी
Comments (0)
Add Comment