नेतान्याहूंच्या भूमिकेमुळेच इस्रायलचे नुकसान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची टीका

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : ‘हमासविरुद्धच्या युद्धामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यामुळेच इस्रायलचे सर्वाधिक नुकसान होत आहे,’ अशी टीका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.

‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये ‘हमास’विरुद्ध युद्ध सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही नेतान्याहू युद्ध सुरू ठेवण्यावर ठाम आहेत. यात ३० हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या मृत्यूंमुळे इस्रायल आंतरराष्ट्रीय पाठिंबा गमावत असल्याचा इशारा बायडेन यांनी याआधीही दिला आहे.

‘या कारवाईमध्ये निष्पापांचे मृत्यू होत असून, नेतान्याहू यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे. गाझा पट्टीतील बळींची संख्या पाहिली, तर नेतान्याहू यांची भूमिका चुकीची असल्याचे दिसून येते,’ असे बायडेन यांनी म्हटले आहे. बायडेन यांच्या विधानातून नेतान्याहू यांच्याबरोबरील त्यांच्या संबंधांतील तणाव दिसून येतो. ‘राफाह शहरात आक्रमण करण्याची तयारी इस्रायल करीत आहे. या शहरामध्ये १३ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आश्रय घेतला आहे. ही मर्यादेची सीमा आहे,’ असेही बायडेन म्हणाले.

अमेरिका उभारणार तात्पुरता पूल

गाझा : गाझा पट्टीतील नागरिकांच्या मदतीसाठी अमेरिकेचे लष्करी जहाज भूमध्य समुद्राच्या दिशेने रवाना झाले आहे. या जहाजावरून तात्पुरत्या स्वरूपातील पूल बांधता येतो. त्यामुळे समुद्रात तात्पुरता पूल उभारून जहाजातील मदत गाझा पट्टीमध्ये वेगाने पोहोचवता येणार आहे. इस्रायलने गाझा पट्टीची नाकेबंदी केली असून, लाखो नागरिक अन्नधान्याच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना मदत पाठवण्यात येत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती.
ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेसह जगभरात लोकशाही धोक्यात; बायडेन यांचा हल्लाबोल
स्पेनकडून पॅलेस्टाइनला मान्यता?

माद्रिद : पॅलेस्टाइन या देशाला मान्यता देण्यासाठी स्पेनच्या संसदेत प्रस्ताव मांडणार असल्याचे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी जाहीर केले आहे. ‘इस्रायल आणि पॅलेस्टाइन अशा दोन स्वतंत्र देशांची स्थापना झाली, तरच ते एकत्रित शांतपणे राहू शकतील,’ असे सांचेझ यांनी म्हटले आहे. ‘इस्रायलच्या गाझा पट्टीतील कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्याविरुद्ध नाराजी वाढत आहे. त्यामुळे द्विराष्ट्राच्या या तोडग्याला अनेक देशांचा पाठिंबा मिळेल,’ अशी आशाही सांचेझ यांनी व्यक्त केली.

Source link

gaza stripisrael hamas warisrael-palestine warIsraeli PM Benjamin Netanyahuisraeli prime minister benjamin netanyahujoe biden news
Comments (0)
Add Comment