३ भावांनी Apple ला लावला ५० कोटींचा चुना; Fake iPhone बनवून सर्वात मोठ्या कंपनीला लुटलं

ग्राहकांच्या सुरक्षा आणि प्रायव्हसीची काळजी घेणाऱ्या Apple कंपनीलाच चुना लावण्यात चोर यशस्वी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीनुसार एक व्यक्तीने मोठ्या शिताफीने अ‍ॅप्पलला ५० कोटींचा गंडा घातला आहे. यासाठी त्यांनी वापरलेली युक्ती देखील तितकीच जबरदस्त आहे. Apple सारख्या बड्या कंपनीला नेमकं कसं आणि कुणी फसवलं हे तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल. हे काम केलं आहे Zhiwei Allen Liao याने आणि त्याला त्याच्या भावांनी देखील या कामात मदत केली. चला जाणून घेऊया.

आयफोन, आयपॅड किंवा अ‍ॅप्पलचा कोणत्याही प्रोडक्टच्या फर्स्ट आणि डुप्लीकेट कॉपी बाजारात सर्रास उपलब्ध आहेत. या भावंडानी याच गोष्टीचा फायदा उचलला आणि कोट्यवधी रुपयांचा स्कॅम केला. या भावांनी मोठ्या शिताफीने Fake iPhone खऱ्या आयफोनमध्ये रूपांतरित केले. त्यांनी १० हजार बनावट आयफोन आणि १० हजार बनावट iPad ओरिजनल प्रोडक्ट सोबत एक्सचेंज केले. परंतु हे करण्यासाठी त्यांनी वापरलेली टेक्निक मात्र आश्चर्यकारक आहे.
हे देखील वाचा: तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर

अश्याप्रकारे केली फसवणूक

मोबाइल निर्माता कंपनी प्रत्येक फोनला एक IMEI नंबर देते, जो त्या फोनचा आधार नंबर असतो असं समजा. हा एक युनिक सीरियल नंबर असतो. Liao भावंडानी यूएस आणि कॅनडामध्ये विकल्या गेलेल्या हजारो आयफोन आणि आयपॅडचे सीरियल नंबर आणि IMEI नंबर काढले.

सीरियल आणि IMEI नंबर मिळवल्यानंतर या तिघांनी चीनमध्ये सर्रास विकले जाणारे बनावट आयफोन मॉडेल्स मागवले. हे मॉडेल्स मागवल्यानंतर त्यांचा खरा खेळ सुरु झाला. आधी त्यांनी कॅनडा आणि यूएसमध्ये जे फोन विकले गेले होते त्यांचे सीरियल नंबर आणि IMEI नंबर चीनवरून आलेल्या बनावट आयफोन मॉडेल्समध्ये सेट केले. त्यानंतर हे सेट केलेले बनावट मॉडेल्स त्यांनी यूएस आणि कॅनडामध्ये पाठवले. तिथे काही तरुणांना पैसे देऊन हे बनावट आयफोन घेऊन कंपनीच्या सर्व्हिस सेंटर मध्ये पाठवण्यात आलं.

अ‍ॅप्पलची एक पॉलिसी आहे ज्यानुसार जर एखाद्या प्रोडक्टमध्ये बिघाड असल्यास कंपनी त्या प्रोडक्टच्या बदल्यात नवीन प्रोडक्ट देते. हे तरुण बनावट फोन घेऊन सर्व्हिस सेंटरमध्ये जात आणि सांगत की फोनमध्ये काही तरी प्रॉब्लम आहे आणि नवीन आयफोन घेऊन तिथून बाहेर पडत. हे नवीन आयफोन मॉडेल्स बाजारात जाऊन विकले जायचे, अशाप्रकारे या भावांनी मिळून कंपनीची ५० कोटींची फसवणूक केली.

Source link

apple scamapple store scamfake iphonesiphone scamiphonesअ‍ॅप्पल स्कॅमनकली आयफोनबनावट आयफोनस्वस्त आयफोन
Comments (0)
Add Comment