इस्रायलमध्ये शेतात राबणाऱ्या भारतीयावर मिसाईल कोसळलं, जागीच अंत; पत्नी ७ महिन्यांची गर्भवती

जेरुसलेम: इस्रायलमध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. तिघेही केरळचे रहिवासी आहेत. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हिजबु्ल्लानं हा हल्ला घडवल्याचं सांगितलं जात आहे.

उत्तर इस्रायलच्या सीमावर्ती भागातील एका बगिच्यावर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयाची ओळख पटली आहे. पॅट निबिन मॅक्सवेल असं मृत तरुणाचं नाव आहे. मॅक्सवेल दोन महिन्यांपूर्वी इस्रायलला गेला होता. तो एका शेतात मजूर म्हणून काम करायचा. मॅक्सवेलच्या पश्चात पत्नी आणि ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्याची पत्नी ७ महिन्यांची गर्भवती आहे. या हल्ल्यात अन्य दोघे जखमी झाले. तेही भारतीय आहेत. बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी त्यांची नावं आहेत.
टॅलेंट अस्सल, ५६ पुरुषांना मागे टाकत अव्वल; BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर; इतिहास घडला!
पॅटचा अपघात झाल्याचं आधी सुनेनं कळवलं. मग मला त्याच्या निधनाची बातमी मिळाली, असं पॅट मॅक्सवेलचे वडील पॅथरॉस मॅक्सवेल यांनी सांगितलं. पॅथरॉय यांना तीन मुलं आहेत. पैकी दोघे इस्रायलमध्ये, तर एक जण अबुधाबीत काम करतो. मॅक्सवेलच्या निधनानंतर भारतातील इस्रायली दूतावासानं शोक व्यक्त केला. ‘हल्ल्यात जखमी झालेल्यांना योग्य उपचार दिले जात आहेत. त्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. एका भारतीय नागरिकांच्या मृत्यूनं धक्का बसला आहे. आम्ही दु:खी आहोत,’ असं ट्विट दूतावासाकडून करण्यात आलं.
आवळा दिला, आता कोहळा काढणार! लोकसभेत शिंदेंचा (नंबर)गेम करण्याची तयारी; भाजपचा प्लान ठरला!
उत्तर इस्रायलमध्ये सीमेच्या जवळ असलेल्या गॅलील परिसरातील एका बागेत सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यात जॉर्ज होरपळला. त्याला जवळच असलेल्या बेलिनसन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा चेहरा भाजला. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे. त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. तर मेल्विनला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उत्तर इस्रायलच्या जिव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो केरळच्या इडुक्कीचा रहिवासी आहे.

Source link

indian man dies in israelindian man dies in missile attackisrael newsइस्रायलमध्ये भारतीय तरुणाचा मृत्यूइस्रायलमध्ये भारतीयाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment