Mumbai Fire मुंबई: खार येथे आठ मजली इमारतीत आग; धुरात गुदमरून महिलेचा मृत्यू

हायलाइट्स:

  • मुंबईत खार येथे आठ मजली इमारतीत आग.
  • एक मुलगी व दोन महिला धुरात गुदमरल्या.
  • रुग्णालयात दाखल करण्याआधी एकीचा मृत्यू.

मुंबई: खार पश्चिम येथे नूतन व्हिला या आठ मजली इमारतीमधील एका घरात गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीदरम्यान धूर नाकातोंडात गेल्याने आणि काही प्रमाणात भाजल्याने गंभीर अवस्थेतील हेमा जगवानी (४०) यांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, संगीता ठाकूर (४५)आणि पलक जगवानी (१०) जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Mumbai Khar Fire Latest News )

वाचा: रजनी पाटलांच्या बिनविरोध निवडीसाठी फडणवीसांची अट?; थोरात म्हणाले…

खार पश्चिमेतील गुरू गणेश्वर मार्गावरील प्लॉट क्रमांक २२९ येथे नूतन व्हिला या आठ मजली इमारतीमधील सातव्या मजल्यावरील एका घरात गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही संपूर्ण इमारत जगवानी कुटुंबीयांची आहे. आग लागल्याचे समजताच पोलीस, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

वाचा: बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

या आगीत नाकातोंडात आगीचा धूर गेल्याने संगीता ठाकूर (४५), हेमा जगवानी (४०), पलक जगवानी (१०) या तिघी गुदमरल्या व आगीच्या झळा बसून काही प्रमाणात भाजल्या. या तिघींना तातडीने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच हेमा जगवानी (४०) यांचा मृत्यू ओढवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. संगीता व पलक यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

वाचा: नितीन गडकरी यांच्या अडचणी वाढणार?; काँग्रेसने कोर्टात केली तक्रार

Source link

fire breaks out in nutan villa buildingmumbai firemumbai fire latest breaking newsmumbai khar firemumbai khar fire latest newsखारनूतन व्हिलासंगीता ठाकूरहिंदुजाहेमा जगवानी
Comments (0)
Add Comment