आणखी एका भारतीयाची हत्या, अमेरिकेतील सेंट लुईस येथे शास्त्रीय नर्तकाला गोळ्या झाडून संपवलं

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : मिसुरीतील सेंट लुईस येथे भारतीय वंशाच्या कुचिपुडी आणि भरतनाट्यम नर्तकाची मंगळवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमरनाथ घोष (वय ३४) असे या नर्तकाचे नाव असून, ते गेल्या वर्षी कोलकात्याहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सेंट लुईस अॅकॅडमीच्या जवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कोण होते अमरनाथ घोष?

सेंट लुईस मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेलमार बुलवार्ड येथे मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता गोळीबार झाला. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागात घोष पदव्युत्तर शिक्षण घेत होते. घोष यांच्या मैत्रिणी हिमा कुप्पा आणि रवी कुप्पा यांनी सांगितले, की ‘घोष नेहमीच आपल्या सादरीकरणासाठी खूप प्रवास करीत असत. बऱ्याच संस्थांनी त्यांना सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. घोष बॅले आणि नृत्य शिकत होते.’

‘नृत्यात पीएचडी करून आमच्या कुचिपुडी आर्ट अॅकॅडमीत पूर्ण वेळ काम करायचे, हे त्यांचे स्वप्न होते,’ असेही हिमाने स्पष्ट केले. घोष यांच्या हत्येनंतर शिकागोतील भारतीय वाणिज्य दूतावासाने स्थानिक पोलिस आणि विद्यापीठासमोर हा मुद्दा उचलून धरला आहे.

भारतीय वंशाच्या किमान अर्धा डझन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकेत भारतीय आणि भारतीय वंशाच्या किमान अर्धा डझन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण आहे.

– पाच फेब्रुवारीला पर्ड्यू विद्यापीठातील २३ वर्षीय भारतीय-अमेरिकी विद्यार्थी समीर कामत इंडियाना येथील अभयारण्यात मृतावस्थेत आढळला होता.
– दोन फेब्रुवारीला वॉशिंग्टनमधील रेस्टॉरंटबाहेर झालेल्या हल्ल्यात ४१ वर्षीय भारतीय वंशाचे विवेक तनेजा गंभीर जखमी झाले होते. त्याआधी आठवडाभरापूर्वी शिकागोमध्ये सय्यद मजहीर अली या भारतीय विद्यार्थ्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता.
देवोलिनाच्या मित्राची अमेरिकेत गोळी झाडून हत्या, अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी
– जॉर्जियातील लिथोनिया शहरात विवेक सैनी (वय २५) या भारतीय विद्यार्थ्यावर व्यसनाधीन व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता.
– जानेवारीत ओहायो राज्यातील लिंडनर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकणारा श्रेयस रेड्डी बेनिगर (वय १९) हा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. स्थानिक प्रशासनाने गैरप्रकाराची शक्यता फेटाळून लावली होती.
– इंडियाना येथील पर्ड्यू विद्यापीठातील नील आचार्य हा भारतीय विद्यार्थी २८ जानेवारी रोजी बेपत्ता झाला.
– ‘युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय’मधील बी. अकुल (वय १८) हा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता.

Source link

Amarnath Ghosh caseAmarnath Ghosh Murder Caseindian classical dancerSt Louis Metropolitanwho was Amarnath Ghosh
Comments (0)
Add Comment