क्लोन केलेला आवाज भासतो अगदी खऱ्या आवाजासारखाच
दररोज कोणी ना कोणी व्हॉईस क्लोनिंग घोटाळ्याचे बळी ठरत आहे. काही काळापूर्वी एका अभ्यासात धक्कादायक खुलासा झाला होता, या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 38 टक्के भारतीय त्यांच्या जवळच्या लोकांच्या खऱ्या आणि क्लोन आवाजात फरक करू शकत नाहीत.या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ही गंभीर चिंतेची बाब आहे कारण तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की क्लोन केलेला आवाज अगदी खऱ्या आवाजासारखाच वाटतो.
व्हॉइस क्लोनिंग कसे केले जाते?
AI उर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून लोक म्हणतात की अनेक कामे सोपी झाली आहेत. एकीकडे तुम्ही AI चे फायदे पाहत असताना, AI चा आणखी एक पैलू देखील आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ AI द्वारे, स्कॅमर पहिले तुमच्या जवळच्या लोकांच्या आवाजाची कॉपी करतात. जेव्हा आवाज कॉपी केला जातो तेव्हा AI च्या मदतीने आवाजाचा क्लोन तयार केला जातो.
लोकांना घाबरवण्यासाठी वापरतात आवाज
स्कॅमर्स हा आवाज लोकांना घाबरवण्यासाठी वापरतात, भीती ही अशी भावना आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी बाकी कसलाही विचार न करता कोणतेही पाऊल उचलते.
कसे होते व्हॉइस क्लोनिंग स्कॅम
समजा तुम्हाला कॉल आला तर तुम्ही कॉल उचलताच पलीकडून आवाज येतो, ‘मम्मी-पापा, प्लीज मला वाचवा’, हे ऐकून कोणालाही धक्का बसेल. पहिले तर स्कॅमर तुमच्या प्रियजनांचा आवाज तुम्हाला ऐकवतात.आणि नंतर तुमच्या मुलाला सुरक्षितपणे सोडण्याच्या बदल्यात तुमच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करतात.तुमच्या प्रियजनांना वाचवण्यासाठी, तुम्ही काहीही विचार न करता घोटाळेबाजांनी सुचवलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता, तेव्हा घोटाळेबाजांचा खेळ पूर्ण होतो आणि ते त्यांच्या खेळात यशस्वी होतात.
व्हॉईस क्लोनिंग स्कॅम कसा ओळखायचा
व्हॉइस क्लोनिंग घोटाळा ओळखणे कठीण असू शकते परंतु अशक्य नाही. जर तुम्हाला कॉल आला आणि कोणीतरी जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीने मदत मागितली तर सावध व्हा. पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी, कृपया तपासा की, फोनवरील व्यक्ती खरोखर तुमच्या ओळखीतील आहे कि नाही.
ज्याचा आवाज आला त्याला कॉल करून पडताळणी करा
ज्या व्यक्तीचा आवाज तुम्ही कॉलवर ऐकला त्याच्या नंबरवर दुसऱ्या फोनवरून कॉल करा. जर आवाज खोटा असेल तर तुम्ही दुसऱ्या नंबरवरून कॉल करता तेव्हा तुम्ही त्याच व्यक्तीशी बोलाल ज्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल.
खऱ्या आणि बनावट आवाजातील फरक समजेल
फोनवर ऐकू येणारा आवाज काळजीपूर्वक ऐका. अर्थात, एआय कितीही प्रगत झाले तरी माणसांसारखे आवाज पुनरुत्पादित करणे शक्य नाही. जर तुम्ही आवाज काळजीपूर्वक ऐकलात तर तुम्हाला खऱ्या आणि बनावट आवाजातील फरक समजू शकेल.
स्कॅमर व्हॉईस क्लोनिंगसाठी या युक्त्या वापरतात
स्कॅमर तुम्हाला व्हॉइस क्लोनिंगसाठी अज्ञात नंबरवरून कॉल करतात.
कॉलवर बोलत असताना, तुमचा आवाज रेकॉर्ड केला जातो.
आवाज रेकॉर्ड केला जातो आणि मग एआयच्या मदतीने आवाजाचे क्लोनिंग केले जाते
आणि मग या आवाजाला शस्त्र बनवून आपल्या प्रियजनांना लुटण्याचा खेळ रचला जातो.