जर्सी हेरिटेजने सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट करत सांगितलं की, एलिझाबेथ महालात अधिकाऱ्यांच्या क्वॉर्टरच्या पहिल्या माळ्यावर डागडुजीचं काम करणाऱ्या मजुरांनी जेव्हा चिमनी उघडली तेव्हा त्यांना त्याच्या आत एका बाटलीत एक संदेश सापडला.
२६ फेब्रुवारी १९६६ च्या या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे, नक्कीच हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘००७ जेम्स बॉण्ड, २६ फेब्रुवारी १९६६. पी. एस. सीक्रेट एजंट. कोणाला सांगू नका.’, असं या पत्रात लिहिलं होतं. तर या पत्राच्या मागे लिहिलं आहे की, ‘ई. ए. ब्लॅम्पिड’, ज्यांचा १९६६ मध्ये मृत्यू झाला होता. हे पत्र शॉन कॉनरी यांच्या जेम्स बॉण्ड फिल्म थंडरबॉलच्या रिलीजच्या दोन महिन्यांनी लिहिण्यात आलं होतं.
जर्सी हेरिटेजने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आम्हाला या रहस्यमयी पत्राबाबत तुमच्या मदतीची गरज आहे’. या बाटलीतील पत्राबाबत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अशा प्रकारचे पत्र सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही. काहीच दिवसांपूर्वी कॅनडाच्या महिलेसोबतही असंच काहीसं घडलं. समुद्रकिनारी स्वच्छता करताना तिला एक विचित्र गोष्ट सापडली. शॅटलर नावाच्या महिलेने याबाबत सोशल मीडियावर शेअर केलं होतं. महिलेलाही एक बाटली सापडली होती, ज्यात पत्र लिहिलेलं होतं. या पत्रात लिहिलं होतं की, ‘हा एक चांगला दिवस आहे आणि आज वाराही नाहीये’. या पत्रासोबत २९ मे १९८९ ही तारीखही लिहिलेली होती. ही बाटली ३४ वर्षांपूर्वी समुद्रात टाकण्यात आली होती आणि ती तेव्हापासून समुद्रात तरंगत होती. ही बाटली कोणीतरी सहज पाण्यात टाकली जेणेकरुन कधीतरी ही कोणाला सापडावी.