LSG vs CSK: धोनीची एंट्री होताच डिकॉकच्या बायकोला दिली Appleनं वॉर्निंग, नेमकं काय घडलं?

महेंद्र सिंह धोनीची लोकप्रियता जगजाहीर आहे. चेन्नईचे चाहते पहिले सहा विकेट पडण्याची आतुरतेने पाहत असतात जेणेकरून ‘थाला’ मैदानात येईल. जेव्हा कॅप्टन कुल मैदानात येतो तेव्हा त्याच स्वागत देखील तेवढंच जोरदार होतं. मैदानातील आवाज देखील गगनभेदी असतो. असंच काहीसं १९ एप्रिलला लखनौमधील इकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाहायला मिळालं.

लखनौ सुपर जायंट्सच्या सलामीवीर क्विंटन डिकॉकच्या पत्नीनं एक स्टोरी इंस्टाग्रामवर शेयर केली आहे. ज्यात दिसलं आहे की महेंद्र सिंह धोनी मैदानात येताच आवाजाचा स्थर सामान्यांपेक्षा किती वाढते.

धोनी येताच अ‍ॅप्पलची वॉर्निंग

क्विंटन डिकॉकच्या पत्नीनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली आहे, आणि दाखवलं आहे की चेन्नई सुपरकिंग्स आणि धोनीचे वेड किती आहे. लखनौ सुपरजायंट्सचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक डिकॉकची पत्नी Sasha नं जी स्टोरी अपलोड केली आहे, त्यात एक स्मार्टवॉच दिसत आहे. ज्यात लाउड एनवायरनमेंट ध्वनी स्थर ९५ डेसिबल पर्यंत गेला आहे.

ही वॉर्निंग तिला तेव्हा मिळालेली जेव्हा मैदानात महेंद्र सिंह धोनीची एंट्री झाली. यावरून धोनी मैदानात येताच चाहत्यांचा उत्साह आणि जल्लोष किती असतो हे समजते. आता धोनी फक्त आयपीएलच्या सामन्यातच खेळत असल्यामुळे हा जल्लोष होणं अपेक्षित आहे.

सामन्यात धोनीनं ९ चेंडूंमध्ये २८ धावांची जबरदस्त नाबाद खेळी केली. यात ३ चौकार आणि दोन सणसणीत शतकारांचा समावेश होता. लखनौला विजयासाठी १७७ धावांची गरज होती. लखनौने एक षटक शिल्लक असताना दोन गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा करून विजय मिळवला.

अ‍ॅप्पल वॉच नॉइज अलर्ट

अ‍ॅप्पल वॉच नॉइज अ‍ॅप मायक्रोफोन आणि एक्सपोजरचा कालावधीचा वापर करून युजरच्या आजूबाजूला असलेल्या आवाजाचा स्थर मोजतं. जेव्हा नॉइज लेव्हल खूप जास्त होते तेव्हा युजर्सना एक वॉर्निंगच्या माध्यमातून अलर्ट करण्यात येतं. असंच काहीसं डिकॉकची पत्नी Sasha सोबत देखील झालं. धोनी मैदानात येताच नॉइज लेव्हल प्रचंड प्रमाणात वाढली होती म्हणून तिच्या अ‍ॅप्पल वॉचवर वॉर्निंग आली होती.

Source link

apple watchchennai super kingsipl 2024ms dhoniquinton de kocksasha de kockअ‍ॅप्पल वॉचचेन्नई सुपर किंग्समहेंद्र सिंह धोनीसाशा डिकॉक
Comments (0)
Add Comment