व्हॉट्सॲप वेबवर स्क्रीन कशी लॉक करावी
- व्हॉट्सॲपच्या वेब व्हर्जनवर स्क्रीन लॉक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सॲप टॅबवर जावे लागेल.
- यानंतर उजव्या बाजूला येणाऱ्या थ्री डॉट आयकॉनवर क्लिक करा.
- मग इथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील. त्यापैकी सेटिंग्ज वर क्लिक करा.
- आता Privacy या ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर, खाली स्क्रोल करा आणि स्क्रीनवर क्लिक करा.
- हे केल्यावर स्क्रीन लॉकचा ऑप्शन तुमच्या समोर येईल.
- समोर दिलेल्या टॉगलवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला पासकोड सेट करावा लागेल. तो किमान 6 कॅरेक्टर लांब असणे आवश्यक आहे.
- पासकोड सेट केल्यानंतर, तुम्हाला आता तीन पर्याय असतील.
- यामध्ये तुम्हाला टॅब सोडल्यानंतर किती वेळ स्क्रीन लॉक होईल हे निवडावे लागेल.
- तुमच्याकडे 1 मिनिटानंतर, 15 मिनिटांनंतर आणि 1 तासानंतरचा पर्याय असेल.
- यापैकी कोणतेही एक निवडा. असे केल्याने व्हॉट्सॲप वेबवर स्क्रीन लॉक होईल.
- आता जेव्हाही तुम्ही WhatsApp वापरण्यासाठी त्याच्या टॅबवर याल तेव्हा तुम्हाला तो पासकोड टाकावा लागेल.
इंटरफेस साइडबारसह WhatsApp करत आहे वेब क्लायंटना अपडेट
सुलभ नेव्हिगेशनसाठी WhatsApp त्याचा वेब क्लायंट इंटरफेस साइडबारसह अपडेट करत आहे. मेटा, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी, भारतासह नवीन प्रदेशांमध्ये जनरेटिव्ह एआय-जनरेटेड एक्सपेरिअन्सची चाचणी घेत आहे. या बदलांचा उद्देश युजर्स एक्सपेरिअन्स वाढवणे आहे. व्हॉट्सॲप आपल्या वेब क्लायंटवर काही युजर्ससाठी रीफ्रेश केलेला यूजर इंटरफेस आणत आहे. एका अहवालानुसार, व्हॉट्सॲप वेबला एक साइडबार मिळत आहे जो युजर्सना चॅट्स, कॉल्स आणि स्टोरीजमध्ये इतर सेक्शनमध्ये त्वरीत नेव्हिगेट करण्यास परमिशन देईल. व्हाट्सएप अपडेट ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार, नवीन WhatsApp वेब इंटरफेस आणला जात आहे. ट्रॅकरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, साइडबार स्क्रीनच्या डाव्या बाजूला उपलब्ध असेल. यामध्ये चॅट्स, कम्युनिटीज, स्टेटस अपडेट्स, चॅनेल, आर्काइव्ह चॅट्स, स्टार मेसेजसाठी चिन्ह आहेत. मेटा एआय चॅटबॉट युजर्सना रोल आउट करत आहे.