हायलाइट्स:
- दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी फिरवली चक्र
- आवळल्या फरारी आरोपीच्या मुसक्या
- पोलिसांची उत्तम कामगिरी
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली पोलिसांनी खवल्या मांजराच्या तस्करीमधील दुसऱ्या फरारी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी रात्री ८ वा.च्या सुमारास दापोली पोलिसांचे पथक या संशयित आरोपीला घेऊन रायगड पोलादपूर येथून दापोलीत दाखल झाले आहे.
संशयित तुकाराम नारायण शिंदे संशयित तुकाराम नारायण शिंदे या आरोपीला कोलाड जि. रायगड मधुन घेण्यात यश आले आहे. संशयित तुकाराम शिंदे हा पेंटर असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली असुन त्याला अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकलवर असलेल्या क्रमांकावरून राज्य परिवहन विभागाकडे असलेल्या पत्त्याची माहिती पोलिसांनी मिळवली.
यावरून रोहा हनुमानवाडी येथे हे पोलीस पथक पोहोचले मात्र तेथील घरात हा संशयित गेले १५ ते २० दिवस रहात नसून ते घर बंद होते. मात्र, त्या परिसरात माहीती घेऊन त्याचा मूळ गावच्या पत्ता पोलिसांना समजला. खैरवाडी पोलादपूर हा त्याच्या मूळ गावचा पत्ता पोलिसांना समजला. तेथे जाऊन दापोली पोलिसांच्या पथकाने या खवले तस्करी प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे.
महाडवरून हे मांजराचे खवले दोन दिवसांपूर्वी दापोलीत व्यवहार करण्यासाठी आणण्यात आले होते. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून संशयित बळीराम नारायण उतेकर वय ४२ याला अटक केली होती. यावेळी संरक्षित असलेल्या खवले मांजराचे खवले सुमारे ४ किलो ७०० ग्राम वजनाचे खवले पोलिसांनी जप्त केले होते. २१ सप्टेंबर रोजी मंगळवारी ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी संशयित तुकाराम नारायण शिंदे हा पोलिसांना चकवा देत निसटला होता.
या संशयिताला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकात उपनिरीक्षक विलास पड्याळ, हवालदार संदीप गुजर, कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली ही कामगिरी केली असून प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनावाखाली पुढील तपास सुरू असून हा व्यवहार दापोलीत कोण करणार होते? या खवल्यांचे नेमके काय होणार होते? कोणाला देण्यात येणार होते? आदी गुलदस्त्यात असलेल्या प्रश्नांची उकल पुढील तपासात होण्याची शक्यता आहे.