hasan mushrif: कार्यकर्त्यांनो सोमय्या यांचे स्वागत करा, संयम पाळा; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

हायलाइट्स:

  • भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावा- हसन मुश्रीफ यांचे आवाहन
  • करीट सोमय्या यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत करावे, त्यांच्या दौर्‍यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नका- मुश्रीफ.
  • कोल्हापूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे, त्यांना विरोध केल्यास वातावरण बिघडू शकते- मुश्रीफ.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, त्यांचे स्वागत करावे, त्यांच्या दौर्‍यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नका असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. (activists welcome somaiya exercise restraint appeal made by rural development minister hasan mushrif)

कोल्हापूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे, त्यांना विरोध केल्यास वातावरण बिघडू शकते. त्यामुळे आपली बदनामी होईल, म्हणून त्यांना विरोध न करता स्वागत करावे असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

क्लिक करा आणि वाचा- ‘हिंदू खतरे में है हा जुमला”; काँग्रेसची भाजपवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन आपले राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कामाची देखील माहिती घ्यावी. भाजपची नेमकी काय स्थिती आहे याचीही माहिती घ्यावी.

आपल्यावर जे आरोप झाले यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सर्व उत्तरे दिली आहेत.कारखान्यात एकही पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. संताजी घोरपडे साखर कारखाना अतिशय उत्कृष्टपणे चालवलेला आहे असे सांगून मुश्रीफ म्हणाले, आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी माझ्या जावयाचा काही संबंध नाही. तो कारखाना अडचणीत होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी तो कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला दिला. आठ वर्षे तोटा सहन करून कंपनीने परत संचालक मंडळाकडे दिला आहे. सध्या साखर कारखाने अडचणीत आहेत. भाजपच्या ताब्यातही अनेक कारखाने आहेत. या कारखान्याचीही माहिती सोमय्या यांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

क्लिक करा आणि वाचा- घरात आलेल्या चोरांनी लग्नातील फोटोंचा अल्बम पाहिला; चोर म्हणाले…

सोमय्या यांनी चुकीच्या लोकांकडून चुकीची माहिती घेऊन बेताल आरोप केल्यानेच आपले कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांचा निषेध केला. पण आता त्यांचे शांततेने स्वागत करण्याचे आवाहन मी कार्यकर्त्यांना केले आहे असे सांगून मुश्रीफ म्हणाले, मुरगूड नगरपालिकेत त्यांना कायमची बंदी घालण्याचा ठराव केला होता. तो ठराव मागे घेण्याची विनंती नगराध्यक्षांना मी केली आहे.

शंभर कोटीच्या नुकसान भरपाईच्या दाव्याबाबत वकिलांशी चर्चा सुरू असून पुढील आठवड्यात सोमय्या यांच्यावर हा दावा दाखल केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. वाय. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील , आर. के. पोवार, राजेश लाटकर उपस्थित होते. यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी केली सही

संयम ठेवा, रानात जावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, फारच त्रास झाला तर टीव्ही बंद करा, शेतात जावा असे आवाहन करतानाच या दौऱ्यात काही अनुचित प्रकार घडला तर असा प्रकार करणारे ते माझे कार्यकर्ते नसतील असा खुलासाही मुश्रीफ यांनी यावेळी केला.

Source link

Hasan MushrifKirit Somaiyaकिरीट सोमय्यासोमय्या यांचा कोल्हापूर दौराहसन मुश्रीफ
Comments (0)
Add Comment