सोनिया फेब्रुवारीत राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. त्याचा संदर्भ मोदी यांच्या भाषणात होता. ‘कॉँग्रेसची स्थिती इतकी नाजूक आहे की, ज्या पक्षाने एकेकाळी ४०० जागा जिंकल्या त्या पक्षाला ३०० जागांवर उमेदवारही मिळू शकले नाहीत. देश कॉँग्रेसला त्यांच्या ‘पापा’ची शिक्षा करीत आहे. कॉँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मैदानात उतरणे टाळले आहे’, अशी टीका त्यांनी केली. ‘जर काँग्रेस सत्तेवर आले तर ते लोकांची संपत्ती मुस्लिमांमध्ये पुनर्वितरित करेल’, असा आरोप करत मोदी यांनी अल्पसंख्याक समुदायाचा देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क आहे, या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. त्यांची शहरी-नक्षलवादी मानसिकता असून माता-भगिनींनो, ते तुमचे मंगळसूत्रही सोडणार नाहीत असे ते राजस्थानच्या बांसवाडा येथे एका सभेला संबोधित करताना म्हणाले.
‘सत्य, अहिंसा हा भारताचा नवा चेहरा’
नवी दिल्ली : ‘जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून भारत आता आत्मविश्वासाने सत्य आणि अहिंसेचा मंत्र जागतिक स्तरावर मांडत असून त्यात आपली सांस्कृतिक प्रतिमाही मोठी भूमिका बजावत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. येथे आयोजित दोन हजार ५५०व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाला संबोधित करताना ते बोलत होते. ‘यूपीए सरकारच्या कार्यकाळात देश निराशेच्या गर्तेत होता. मात्र २०१४मध्ये सत्तेत आलेल्या आमच्या सरकारने वारसा आणि भौतिक विकासाला चालना देण्यावर भर दिला,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देताना मोदी यांनी लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव सुरू असून भविष्यात एक नवीन प्रवास सुरू होईल, असा विश्वास संपूर्ण देशाला असल्याचे नमूद केले. मोदी यांनी यावेळी योग आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय वारशाच्या प्रसारासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा दाखला दिला आणि देशाची नवी पिढी आता स्वाभिमान हीच आपली ओळख मानते, असे अधोरेखित केले.
‘काँग्रेस म्हणजे घोटाळा, दहशतवाद, माओवाद’
रायपूर : ‘काँग्रेस म्हणजे घोटाळे, दहशतवाद आणि माओदाचे दुसरे नाव आहे. ज्या वयात तरुणांच्या हातात टॅबलेट आणि चांगले पुस्तक असायला हवे आणि जगाला पुढे नेण्याची जिद्द त्यांच्यात असायला हवी, त्या वयात काँग्रेसने तरुणांच्या हातात पिस्तुले दिली. त्या तरुणांना काँग्रेसने माओवाद आणि दहशतवादाच्या नावाखाली देशाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले,’ असा दावा करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशवासींनी गेल्या १० वर्षांत देश बदलताना पाहिला आहे, असे ते म्हणाले. छत्तीसगडमधील कबिरधाम जिल्ह्यातील प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
राजस्थानही देशभक्तांची भूमी आहे. येथील नागरिकांना माहिती आहे की, कॉँग्रेस कधीही भारताला बळकट करू शकणार नाही. कॉँग्रेसने भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या माध्यमातून देश पोखरला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान