वॉरंटी नसतानाही मोफत बदलून मिळेल स्क्रीन आणि बॅटरीही; Samsung युजर्सना ३० एप्रिल पर्यंत संधी

सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोन्स Galaxy S21 सीरीज आणि Galaxy S22 सीरीजच्या डिस्प्लेमध्ये ग्रीन लाइनची समस्या येत आहे. फोनमध्ये येणारी ही समस्या यावर्षीच्या सुरुवातीपासून येत असल्याची माहिती अनेक रिपोर्ट्स मधून समोर आली आहे. डिस्प्लेमध्ये आलेल्या या बिघाडामुळे युजर्सची चिंता वाढली होती. आता कंपनीनं या फोनच्या युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. सॅमसंग ग्रीन लाइन इश्यू असलेल्या सर्व फोन्सची स्क्रीन मोफत मध्ये रिप्लेस (फ्री-ऑफ-कॉस्ट वन-टाइम रिप्लेसमेंट) करेल. सॅम मोबाइलच्या रिपोर्टनुसार सॅमसंगच्या या ऑफरचा फायदा आउट ऑफ वॉरंटी डिवाइसेस देखील घेऊ शकतात.

फ्री बॅटरी आणि किट रिप्लेसमेंट

विशेष म्हणजे कंपनी ग्रीन लाइन इश्यू असलेल्या फोन्सच्या स्क्रीन रिप्लेसमेंटसह मोफत बॅटरी आणि किट रिप्लेसमेंट देखील देत आहे. युजर या ऑफरचा फायदा ३० एप्रिल पर्यंत घेऊ शकतात. या सर्व्हिससाठी युजर्सना सॅमसंग सर्व्हिस सेंटर जावं लागेल. सॅमसंगच्या सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेल्या फोन्समध्ये ही समस्या गेली अनेक दिवस येत आहे. यामुळे कंपनीला काही मार्केट्समध्ये वन-टाइम फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट द्यावी लागली आहे. गॅलेक्सी एस२० सीरीज आणि नोट२० सीरीजमध्ये देखील ही समस्या येत होती.

येत आहे गॅलेक्सी एफ५५

सॅमसंग सध्या आपल्या गॅलेक्सी एफ सीरीजचा नवीन फोन गॅलेक्सी एफ५५ लाँच करण्याची तयारी करत आहे. गुगल प्ले कंसोलच्या लिस्टिंगमध्ये गॅलेक्सी एफ५५ चे जे फीचर आणि स्पेसिफिकेशन सांगण्यात आले आहेत, त्यानुसार हा अलीकडेच आलेल्या गॅलेक्सी एम५५ ५जी चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. गॅलेक्सी एफ५५ मध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट देणार आहे. फोन ८जीबी रॅमसह येईल, याचा डिस्प्ले १२०हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. गॅलेक्सी एफ५५ ला BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वर देखील लिस्ट झाला आहे. तसेच फोन सॅमसंग इंडियाच्या सपोर्ट पेजवर देखील दिसला आहे.

Source link

free screen replacement samsunggalaxy green line issuegalaxy s21 seriesgalaxy s22samsungsamsung green line issuesamsung screen replacementग्रीन लाइनसॅमसंगसॅमसंग गॅलेक्सी
Comments (0)
Add Comment