ही एक थक्क करणारी बाब असली तरी, AliDeachमधील काही जपानी डेव्हलपर्सनं एक AI टूल तयार केले आहे जे खरोखर अविश्वसनीय आहे. एआय टूल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तो कधी नोकरी सोडेल हे सांगू शकतो.
AI टूलची कोणी केली निर्मिती
तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला, असेल की या भन्नाट AI टूलची निर्मिती कोणी केली तर जाणून घेऊया ‘की टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे’ प्रोफेसर नरुहिको शिराटोरी यांनी AI टूल्स तयार करण्यासाठी स्टार्ट-अपची स्थापना केली आहे की टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नरुहिको शिराटोरी यांनी AI टूल्स तयार करण्यासाठी स्टार्ट-अपची स्थापना केली आहे
कसे काम करते हे AI टूल
हे एआय टूल कर्मचाऱ्यांच्या रजा घेण्याच्या पद्धती, कर्मचाऱ्यांची उपस्थिती किंवा हजेरी अशा अनेक गोष्टींचे मूल्यांकन करते आणि कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या डेटाचा अभ्यास करून अहवाल तयार करते. रिपोर्ट्सनुसार, या AI टूलची अनेक कंपन्यांच्या सहकार्याने चाचणी केली जात आहे. कंपनीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन कंपनी त्यात सुधारणा करून शकते. तसेच, आधीच कारण माहित असल्यास कंपनी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू शकते.
AI भविष्यात फायदेशीर ठरण्याची शक्यता
एआयच्या आगमनाने केवळ नोकऱ्यांचे नुकसान होईल असे नाही. काही तज्ञांचे म्हणणे आहे की AI मानवी कार्य सुलभ करेल आणि अनेक नवीन क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जसे पूर्वी काही लोकांना असे वाटत होते की संगणकामुळे बेरोजगारी निर्माण होईल, परंतु आज संगणकाने जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, एआयच्या बाबतीतही असेच काही घडणार आहे. लोकांनी फक्त हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्यासोबत पुढे जाण्याची गरज आहे.