स्मार्टफोन फ्री चाइल्डहुड
या समस्यांमुळे किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करू नये म्हणून आता युरोप आणि अमेरिकेत मोहिमा राबवल्या जात आहेत आणि पालक या मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. अलीकडेच ब्रिटनमधील डेझी ग्रीनवेल आणि क्लेअर फर्नी हॉग यांनी आपल्या मुलांना स्मार्टफोनच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. दोघांनीही इंस्टाग्रामवर ही मोहीम सुरू केली तेव्हा ६० हजारांहून अधिक पालक त्यात सामील झाले. त्यानंतर या सर्वांनी मिळून ‘स्मार्टफोन फ्री चाइल्डहुड’ नावाचा ग्रुप तयार केला. मुलांमधील स्मार्टफोनचे व्यसन कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
भारतातील ८३ टक्के टिनएजर्स स्मार्टफोन वापरतात
मॅकॅफीच्या 2022 च्या ‘ग्लोबल कनेक्टेड फॅमिली’ अहवालानुसार, भारतात 10 ते 14 वर्षे वयोगटातील 83 टक्के मुले स्मार्टफोन वापरतात. याच अहवालात जगातील ही संख्या 76 टक्के असल्याचे म्हटले आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन क्लासेसमुळे स्मार्टफोनचा वापरही वाढला आहे.
युनेस्कोने स्मार्टफोनच्या जागतिक बंदीवर केली चर्चा
युनेस्कोने किशोरवयीन मुलांसाठी स्मार्टफोनवर जागतिक बंदी घालण्याची वकिली केली होती. ‘यूएन एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल एजन्सी’च्या अहवालात शाळांमध्ये स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा, असे म्हटले आहे. तर 2018 मध्ये फ्रान्सने 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्मार्टफोनवर बंदी घातली होती. यावर्षी नेदरलँडनेही शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलवर बंदी घातली आहे.