Ton AC: खोलीच्या आकारमानाप्रमाणे तिथं लावण्यात येणाऱ्या ACची क्षमता ठरवली जाते. तर तुम्ही २ टन क्षमतेचा AC लावल्यास तो १ तासाला किती वीजखर्च करतो हे प्रत्येक वापरकर्त्याला जाणून घ्यायचे असते. तुम्हालाही हे जाणून घ्यायचे असल्यास याकडे एक नजर टाकणार आहोत. पाहूया..
2 टन एसी एका तासात किती वीज वापरतो हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की,
2 टन एसी एका तासात किती वीज वापरतो हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की,
- ACची एनर्जी एफीशिएंट रेटिंग (EER): EER रेटिंग जितके जास्त असेल तितकाच AC अधिक कार्यक्षम असेल आणि तो कमी वीज वापरतो.
- खोलीचे तापमान: जर खोली गरम असेल तर एसीला थंड होण्यासाठी जास्त पॉवर लागेल आणि त्यामुळे तो जास्त वीज वापरेल.
- खोलीचा आकार: लहान खोलीच्या तुलनेने ACला मोठी खोली थंड करण्यास अधिक पॉवर लागेल. यामुळे विजेचा वापर देखील जास्त होईल
- ACचे उपयोग: एसीचा वापर अधिक असल्यास वीजही जास्त लागेल
भारतात, 2 टन एसीचा सरासरी वीज वापर ताशी 1,500 ते 2,500 वॅट्स इतकी पॉवर घेतो. याचा अर्थ एका तासात हा AC 1.5 ते 2.5 युनिट वीज वापरतो
ACच्या वीज वापराबद्दल जाणून घेऊया
- 1.5 टन एसी: 1,200 ते 1,800 वॅट्स प्रति तास (ताशी 1.2 ते 1.8 युनिट पॉवर)
- 2 टन एसी: 1,500 ते 2,500 वॅट्स प्रति तास (ताशी 1.5 ते 2.5 युनिट पॉवर)
- 2.5 टन एसी: 1,800 ते 3,000 वॅट्स प्रति तास (ताशी 1.8 ते 3.0 युनिट पॉवर)
वरील आकडे हे अंदाजित स्वरुपाचे आहेत. तुमच्या एसीचा खरा वीज वापर विविध घटकांवर अवलंबून असतो.
एसीचा वीज वापर कमी करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता.
- हाय EER रेटिंगसह असलेला एसी निवडा.
- खोलीचे तापमान 24°C ते 26°C दरम्यान ठेवा.
- खोलीत कुणीही नसताना एसी बंद करा.
- सूर्य प्रकाशातून येणारी उष्णता उष्णता रोखण्यासाठी पडदे आणि खिडक्या बंद ठेवा.
- तुमच्या एसीची नियमित सर्व्हिस करून घ्या.
असे केल्यास तुम्ही वीजवापरावर नियंत्रण ठेवू शकता व यामाध्यमातून पर्यावरचे देखील संवर्धन होईल