हायलाइट्स:
- सिरोंचा तालुक्यात तब्बल साडेचार लाखांचा सागवान जप्त.
- आसरअली परिसरात यापूर्वीसुद्धा चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात सागवान जप्त केले होते.
- सिरोंचा तालुक्यालगत छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगाण राज्याच्या सीमा असल्याने होते मोठ्या प्रमाणात तस्करी.
गडचिरोली: महाराष्ट्रातून तेलंगाण राज्यात जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाची वनउपज तपासणी नाक्याजवळ झडती घेऊन चारचाकी वाहनसह तब्बल साडेचार लाखांचा सागवान जप्त केल्याची घटना आज सिरोंचा तालुक्यात घडली. (teak timber was being smuggled from maharashtra to telangana)
गडचिरोली जिल्हा हा मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध आहे. सिरोंचा तालुक्यालगत छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून निदर्शनास येते. सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या आसरअली परिसरात यापूर्वीसुद्धा वनविभागाने कारवाई करत चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात सागवान जप्त केले होते.
क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार
गोदावरी आणि प्राणहिता नदीवर दोन राज्यांना जोडणारा आंतरराज्यीय पूल झाल्याने याठिकाणी तीन राज्यांची रहदारी वाढली असून त्यासोबतच अवैध धंद्यांना सुद्धा उत आला आहे. त्यामुळेच वनविभागाने या ठिकाणी वनउपज नाका बसविले असतानासुद्धा मौल्यवान सागवान तस्करी काही थांबताना दिसत नाही.आज सिरोंचा तालुक्यातील आसरअली कडून तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या ए पी-१५ टी ए ०३१४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनांची चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्याजवळ तपासणी केली असता,त्या वाहनातून सागवान फाट्या ३२ नग आणि साग छिलपट २२ नग असे एकूण ५४ नग १.९९७ घनमीटर जवळपास १ लाख ४० हजार १०७ रुपयांचा सागवान माल तेलंगाना कडे घेऊन जात असताना आढळले.लगेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहन किंमत ३ लाख रुपये असे एकूण ४ लाख ४० हजार १०७ रुपये किमतीचा माल जप्त केला.
क्लिक करा आणि वाचा- मंदिरे, धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार; पाहा, संपूर्ण नवी नियमावली!
वाहन चालक सारय्या नारायण नलबुगा (२७) रा.आसरअली,तालुका सिरोंचा,जिल्हा गडचिरोली याला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार आणि सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा चे वनपरिक्षेत्र अधिकारी कटकु व त्यांचे चमू करीत आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ३,२८६ नवे रुग्ण वाढले; तर, मुंबई-ठाण्यात ‘ही’ स्थिती!