मेष राशीचा स्वामी मंगळ
मेष राशी बजरंगबलींची विशेष प्रिय राशी आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळवारचा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाचे हनुमानासोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते. जर कुंडलीत मंगळाचा दुष्प्रभाव चालू असेल तर हनुमान जयंतीसह प्रत्येक शनिवारी हनुमानाची पूजा केली पाहिजे.
सिंह राशीचा स्वामी सूर्य
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. भगवान हनुमानाचे गुरू सूर्यदेव आहेत. बजरंगबलीने सूर्यदेवाकडून शिक्षा घेतली असून सिद्धी मिळवली आहे, त्यामुळे गुरूची राशी असलेल्या सिंहवर हनुमानांची कृपा नेहमी राहाते. जीवनात सुखसमृद्धी मिळवण्यासाठी सूर्यदेवाची पूजा नेहमी केली पाहिजे.
कुंंभ राशीचा स्वामी शनिदेव
कुंंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. कुंभ राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा असते, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार शनिदेव रावणाच्या लंकेत भाजले होते, त्या वेळी हनुमानाने त्यांना वेदनेपासून मुक्ती दिली होती आणि त्यांच्या शरीरावर मोहरीचे तेल लावले होते. तेव्हापासून शनिदेवाला तेल वाहिले जाते. तसेच शनिदेवाने म्हटले होते की हनुमानाची आराधना केल्याने शनीच्या दृष्टीपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून हनुमान आणि शनिदेव मित्र मानले जातात.
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर भगवान हनुमानाची कृपा सदैव राहाते. जर तुम्हाला हनुमानाची कृपा हवी असेल तर हनुमान जयंतीला बजरंगबलींना लाडूचा प्रसाद अर्पण करावा. त्यामुळे बल, बुद्धी, यश यात वृद्धी होईल. वृश्चिक राशींच्या लोकांनी मंगळवारी हनुमानाची पूजा आवश्य करावी.
हनुमान जयंती दिवशी बजरंगबलींना प्रसन्न करण्याचे उपाय
- हनुमान जयंती दिवशी बजरंगबलींना प्रसन्न करण्यासाठी बुंदीचा प्रसाद किंवा बुंदीचे लाडू अपर्ण करावेत, त्यामुळे नवग्रह शांत होतील आणि जीवनात सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल.
- हनुमान जयंतीला गोड पानाचा विडा, कुंक, लाल रंगाचे कापड हनुमान मंदिरात अर्पण करावे.
- जर शनिदेवाची साडेसाती किंवा ढैय्या सुरू असेल तर हनुमान जयंतीला मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून हनुमानाची आरती करावी. त्यामुळे कुंडलीवरील शनीच्या छायेपासून मुक्ती मिळेल.
- फक्त हनुमान जयंतीलाच नाही तर प्रत्येक मंगळवारी स्नान करून लाल वस्त्र परिधान करून विधी, विधानासह हनुमानाची पूजा करावी आणि कुंकू अपर्ण करावे.