एअरटेलने एक नवीन इंटरनॅशनल रोमिंग पॅक लॉन्च केला आहे. नावावरून तुम्हाला माहिती आहे की, हा प्लॅन परदेशात प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा एक इंटरनॅशनल रोमिंग पॅक आहे. कंपनीचा टॅरिफ प्लॅन 133 रुपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये विदेशी सिम अत्यंत कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. याशिवाय या पॅकमध्ये अधिक चांगले डेटा फायदे मिळतात. यासह इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.
कोणकोणत्या देशांमध्ये हा प्लॅन उपलब्ध असेल
Airtel कंपनीचा हा नवा पॅक एकूण 184 देशांमध्ये मिळणार आहे.
इंटरनॅशनल रोमिंग पॅक
एअरटेल कंपनीचा हा प्लॅन १३३ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री लोकल सिम मिळेल. जर तुम्ही जगभरात कुठेही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही एक निवड ठरु शकते, ज्यामुळे एकाच पॅकमध्ये जगभरात उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. यामध्ये वारंवार करणाऱ्यांसाठी ऑटो रिन्यूअल ही सुविधा देण्यात आली आहे, ज्यामध्ये पुन्हा पुन्हा हे पॅक खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एअरटेलच्या ‘थँक्स ॲप’द्वारे यूजर्स या सेवेचा आनंद घेऊ शकतात.
Airtelचे इतर इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स
- एअरटेलचा 195 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन 24 तासांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये 250MB डेटासह 100 मिनिटे आउटगोइंग कॉल्स मिळतात. तसेच 100 आउटगोइंग SMSची सुविधा उपलब्ध असेल.
- एअरटेलचा 295 रुपयांचा प्लॅन 24 तासांची व्हॅलिडिटी देतो. प्लॅन 500MB डेटासह 100 मिनिटे आउटगोइंग एसएमएस सुविधा देते. याशिवाय 100SMS आउटगोइंग एसएमएस सुविधा उपलब्ध असेल.
- एअरटेलच्या 595 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 तासांची असेल. प्लॅनमध्ये 1 GB डेटासह 100 मिनिटे आउटगोइंग कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय 100SMS आउटगोइंग एसएमएस दिले जातील.