घरात घुसून धाड धाड धाड… भाजप नेत्याच्या मुलाच्या हत्येचं रहस्य उलगडलं, भावानेच दिली सुपारी

बंगळुरु: कर्नाटकच्या गडग-बेटागेरी येथील भाजप नेते प्रकाश बकाले यांच्या कुटुंबातील ४ जणांच्या हत्येचं गूढ अखेर उलगडलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात भाजप नेत्याचा मुलगा विनायक बकालेसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. विनायकने आपलेच वडील प्रकाश, आई सुनंदा आणि भाऊ कार्तिकच्या हत्येसाठी ६५ लाखांची सुपारी दिली होती. त्यांच्या कुटुंबात संपत्तीवरुन वाद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

चार जणांच्या हत्येची ही धक्कादायक घटना १९ एप्रिलला घडली होती. विनायक बकालेने आपले आई-वडील आणि भावाच्या हत्येसाठी फिरोज खाजी (२९) या काँट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती. या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे तिघांची हत्या केल्यानंतर घरातून लुटलेला सर्व माल हा फिरोज घेऊन गेला. फिरोज हा ठरलेल्या योजनेनुसार आपल्या साथीदारांसोबत बकाले यांच्या घरात शिरला होता. त्याला सांगण्यात आलं होतं की घरात फक्त तिघे असतील. त्यानुसार त्याने संपूर्ण योजना आखली होती. पण, कार्तिक याचं लग्न ठरलं असल्याने घरी काही नातेवाइक आणि ओळखीचे काही लोक होते. हल्लेखोर घरात शिरलेले पाहून प्रकाश यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांची आरडाओरड ऐकून लोक जमले. यामुळे घाबरलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सरुवात केली आणि गोळीबार करत ते तिथून पळून गेले. या घटनेत प्रकाश आणि सुनंदा वेगवेगळ्या खोलीत असल्याने बचावले. पण, मुलगा कार्तिकला गोळ्या लागल्या. त्याच्यासोबत तिथे उपस्थित इतर तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कार्तिक (२७), परशुराम हादिमानी (५५), लक्ष्मी हादिमानी (४५) आणि आकांक्षा हादिमानी (१६) यांचा मृत्यू झाला. प्रकाश बकाले हे बालंबाल वाचले. कार्तिक हा प्रकाश बकाले यांच्या दुसऱ्या पत्नी सुनंदा यांचा मुलगा होता. तो गडग-बेटागेरी सिटी नगर परिषदेचा उपाध्यक्षही होता. त्याचा सावत्र भाऊ विनायशी संपत्तीवरुन वाद सुरु होता.

जेलमधून आला, डाव रचला, मॉरिसचा निर्णय घोसाळकरांच्या जिवावर बेतला

पोलिसांना तापासादरम्यान असं दिसून आलं की घरात दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोकड सगळ जसंच्या तसं आहे. त्यामुळे पोलिसांना संशय आला की या घटनेमागे लूट नाही तर वेगळाच उद्देश्य आहे. जेव्हा पोलिसांनी याचा सखोल तपास केला तेव्हा त्यांना संपत्तीच्या वादाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी विनायक बकालेची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने सारी हकीगत सांगितली. यानंतर पोलिसांनी विनायक प्रकाश बकाले (३५), फिरोज खाजी (२९), जिशान खाजी (२४), साहिल अशफाक खाजी (१९), सोहेल अशफाक खाजी (१९), सुल्तान जिलानी शेख (२३), महेश जगन्नाथ साळुंखे (२१) आणि वहीद लियाकत बेपारी (२१) या आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Source link

bjp leaderGadag murder mysteryKarnataka PolicePrakash BakaleQuadruple murder Casesupari killersupari To kill familyVinayak Bakaleआई-वडिलांची सुपारीकर्नाटक गडग मर्डर केसप्रकाश बकालेविनायक बकाले
Comments (0)
Add Comment