सध्याच्या आधुनिक काळात स्मार्टफोन ही एक गरज झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत एक फोन बाळगतो. फोनसोबत चार्जर किंवा इतर ॲक्सेसरीज देखील आपण खरेदी करतो. मात्र अनेकदा यामुळे आपले मोठे नुकसान होते. कसे ते जाणून घ्या
फोन कसा ठरतोय जीवघेणा
फोन दोन प्रकारे माणसांचा घेत आहे. यास माणसाचे वर्तन कारणीभूत आहे. यामध्ये स्मार्टफोनचा कोणताही दोष नाही. मात्र, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे तणाव, चिंता, नैराश्य आणि झोप न लागणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. रिपोर्टनुसार, फोन जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांना थकवा, डोकेदुखी, मान आणि बोटांना दुखावा होऊ शकतो. याशिवाय युजर्स स्वस्त किंमत मिळण्यासाठी खराब डिस्प्ले असलेले फोन खरेदी करतात, त्यातून निघणाऱ्या ब्लू लाइटमुळे निद्रानाशाची समस्या वाढत आहे. फोनवर जास्त वेळ घालवल्याने लोकांच्या नात्यात तणाव आणि एकाकीपणा येतो, ज्यामुळे आत्महत्येसारख्या घटना घडतात.
फोन घेतांना आरोग्याचाही विचार करा
प्रत्येकाने नेहमी चांगल्या ब्रँडचा फोन विकत घ्यावा, कारण खराब बॅटरी किंवा चार्जरमुळे फोन फुटल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. फोनच्या अतिवापरामुळे गरम होण्याच्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे फोनला आग लागू शकते. वायरिंगमुळे किंवा पाण्यात पडल्यामुळे कोणत्याही ब्रँडच्या स्मार्टफोनमुळे विजेचा धक्का बसू शकतो.
काय करायला हवे
- अशा स्थितीत नेहमी चांगला डिस्प्ले असलेला फोन खरेदी करावा.
- नेहमी चांगल्या ब्रँडचा स्मार्टफोन आणि चार्जर खरेदी करावा.
- सोशल मीडिया आणि फोन वापरण्याची वेळ मर्यादित असावी.
- फोन उष्णता आणि पाण्यापासून दूर ठेवावा.
- आपल्या फोनचा वापर योग्य करावा जेणेकरून तो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही